Disha Salian : 'दिशा सालियनवर आदित्य, सूरज, दिनो अन् अंगरक्षकानं...', वकील निलेश ओझांचे गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य
Disha Salian : दिशा सालियनच्या वडिलांच्या वकिलांनी या प्रकरणामध्ये गंभीर आरोप केले आहेत, त्याचबरोबर त्यांनी उध्दव ठाकरेंना देखील लक्ष्य केलं आहे.

मुंबई: दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे, त्याच कारण म्हणजे दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी सतीश सालियन यांनी केला आहे. दिशा सालियन मृत्यूचा तपास पुन्हा एकदा करावा अशी नवीन याचिका सतीश सालियन यांनी दाखल केली आहे. या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसह, त्याचे सुपूत्र आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
दिशावर आदित्य, सूरज, दिनो अन् अंगरक्षकानं...
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात बोलताना वकील निलेश ओझा म्हणाले, दिशा सालियनचे वडिल 2.5 वर्ष गप्प होते. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुणाकडे दाद मागणार? ते उद्धव ठाकरेंच्या गुंडांचं सरकार होतं. जिथं केंद्रीय मंत्री सुरक्षित नाही, अभिनेत्रीचं घर तोडलं जातं, सैनिकाला घरात घुसून मारलं जातं, तिथं सामन्य माणसाला कोण विचारणार? दिशा सालियनवर आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या आणि आदित्य ठाकरेंच्या अंगरक्षकानं सामुहिक बलात्कार केला असल्याचा गंभीर आरोप निलेश ओझा यांनी केला आहे. सारं काही माहिती असुनही त्यांना पाठिशी घालणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तितकेच दोषी आहेत. सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले ओझा?
आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात सामुहिक बलात्कार, मर्डर 376 डी, 302, 120 अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. कस्टडी घेण्यात यावी. यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावं ही आमची प्रमुख मागणी आहे, राशिद खान पठाण यांच्या जनहीत याचिकेसोबत सतिश सालियन यांची याचिका जोडण्यात यावी. याप्रकरणी साल 2024 मध्ये राशिद खान पठाण यांनी लेखी तक्रार दिलेली आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करायला पाहिजे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करताना समीर वानखेडेंकडे दिशा सालियन प्रकरणातील काही महत्त्वाचे पुरावे सापडले होते. ते हायकोर्टात सादर करण्याचे आदेश देण्याची मागणीही आम्ही कोर्टाकडे केली आहे. याप्रकरणी याचिकाकर्ता म्हणून आम्हाला काही झालं तर त्यासाठी आदित्य ठाकरे आणि गँग त्याला जबाबदार असेल असं देखील पत्रकार परिषदेत बोलताना वकील निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.
दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत
आपल्या मुलीवर सामूहित बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी केला आणि या प्रकरणाने पुन्हा एकदा तोंड वर काढलं. दिशा सालियन मृत्यूचा तपास पुन्हा एकदा करावा अशी नवीन याचिका सतीश सालियन यांनी दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि किशोरी पेडणेकरांनी आपल्यावर दबाव आणला होता. अर्णब गोस्वामी आणि नितेश राणेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे असं या याचिकेतून म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

