एक्स्प्लोर

कांजूरमार्गमधील 'ती' 15 हेक्टर जागा कोणाची? आदित्य ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

कांजूरमार्गमध्ये इंटिग्रेटेड कारशेड होऊन मुंबईकरांचा वेळ, पैसा वाचला असता. पण त्यामध्ये खोडा घातल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे मेट्रो- 6 ला जागा देण्यावरून वाद पेटण्याची चिन्हे आहेत. 

Aaditya Thackeray : मेट्रो-6 प्रकल्पासाठी जागा देण्यावरून आदित्य ठाकरे यांनी कांजूरमार्गमधील जागेवरून शिंदे फडणवीस सरकारला घेरताना कडाडून हल्लाबोल केला आहे. कांजूरमार्गमधील ती 15 हेक्टर जागा कोणाची? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ज्या कांजूरमार्ग जागेवरून वाद झाला त्याच जागेवरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना शिंदे फडणवीस सरकारचा मुंबईवर राग कशासाठी? अशी विचारणा केली. कांजूरमार्गमध्ये इंटिग्रेटेड कारशेड होऊन मुंबईकरांचा वेळ, पैसा वाचला असता, पण खोडा घातल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे मेट्रो- 6 ला जागा देण्यावरून वाद पेटण्याची चिन्हे आहेत. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, महसूल विभागाकडून मेट्रो 6 साठी कांजूरमार्गच्या जागेचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आपण आरे ऐवजी कांजूरमार्ग या ठिकाणी सांगितलं होतं. चार कार डेपो एकत्र करणार असल्याने साडेचार कोटी जनतेला जोडलं असत आणि त्यामधून 10 हजार कोटी रुपये वाचले असते. आम्ही हे काम हाती घेतल्यानंतर  त्यावेळी आरेमधील आदिवासी जनतेला ती जागा राहिली असती. मात्र, महाराष्ट्र भाजप आणि इतर जणांनी कोर्टात गोंधळ घातला. अनेक आंदोलने झाली. आता झाडे कापण्याचा प्रयत्न सुरु असून आणखी झाडे तोडली जाणार आहेत. या घटनाबाह्य सरकारचा एवढा राग का आहे? हे घोटाळे सर्व बाहेर आणणार आहे. 

जनेतेचा वेळ, पैसा वाचावा हे आम्ही पाहत होतो. कांजूरमार्ग कारशेड झालं असतं, तर साडे दहा ते  साडे दहा हजार कोटी वाचले असते. त्याठिकाणी इंटिग्रेटेड कारशेड झालं असतं. आम्ही आरे कारशेडमधील 800 एकर परिसर जंगल म्हणून घोषित केलं. मुंबईकरांना इंटिग्रेटेड कारशेडपासून वंचित ठेवलं. आता सुप्रीम कोर्टातील केस माघार घेण्यात आली आहे. 44 हेक्टरपैकी 15 हेक्टर जमीन कोणाच्या मालकीची आहे? संबंधितांना भरपाई देणार आहेत की नाही? अशी विचारणा त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget