Mega Block : सेंट्रल लाईनवर रविवारी मेगा ब्लॉक, हार्बर लाईनवर लोकल सुरळीत राहणार
Mumbai Local Mega Block : महाराष्ट्र भूषण सोहळा असल्याने रविवारी हार्बर लाईनवरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
मुंबई: रविवारी मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आल्याचं मध्य रेल्वेने म्हटलं आहे. तर महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या आयोजनामुळे हार्बर लाईनवरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
Mumbai Local Mega Block : असा असेल मेगा ब्लॉक
रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत असल्याचं सांगत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनने दिलगीर व्यक्त केली आहे.
No Mega Block on Harbor Line : हार्बर लाईनवर मेगाब्लॉक असणार नाही
हार्बर लाईनवर यापूर्वी जाहीर केलेला मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार नाही.
रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या दिवशी हार्बर रेल्वे मार्गावर होणारा मेगा ब्लॉक (Harbour Line Mega Block) रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार नाही. मात्र, मेनलाईन वर माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर अगोदर जाहीर केल्याप्रमाणे मेगा ब्लॉक राहणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली होती. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी देखील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे.
ही बातमी वाचा: