एक्स्प्लोर
भंगलेल्या स्वप्नात पुन्हा रंग, अॅसिड हल्ला पीडितेचा विवाह

मुंबई : 5 वर्षांपूर्वी भंगलेल्या स्वप्नामध्ये, पुन्हा एकदा रंग भरण्यात आले. ललिता बन्सी बोहल्यावर चढली. 2012 मध्ये झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर आपलं कधी लग्न होईल असा विश्वासही ललितानं गमावला होता. राहुल कुमार नावाच्या तरुणानं चुकून केलेल्या एका फोन कॉलमुळे ललिताचं आयुष्य सुखद वळणावर येऊन पोहोचलं. राहुल कुमारनं राँग नंबर डायल केला, पण तो लागला 'राईट नंबर'ला. तो म्हणाला की त्याचं ललिताच्या मनावर प्रेम आहे, चेहऱ्यावर नाही. ललिता 20 वर्षांची असताना तिच्या चुलत भावानं तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आतापर्यंत 17 शस्त्रक्रिया झाल्या, तर अजून 12 शस्त्रक्रिया बाकी आहेत. अॅसिड हल्ल्यानंतर ललितानं आत्मविश्वास गमावला होता. मात्र राहुलसारखा जोडीदार मिळाल्यामुळे ललिताच्या आयुष्याचं सुखद पर्व सुरु झालं आहे. विशेष म्हणजे ललिता आणि राहुलच्य़ा लग्नासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता विवेक ऑबेरॉय आणि आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक उद्योजकांनी ललिताला मदत केली. देव माणसात असतो असं म्हणतात. आज राहुल आणि ललिताला मदत करणाऱ्यांच्या रुपात त्याचं दर्शन घडलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















