एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन, मुंबई पाऊस अपडेट 2.30 PM
*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन, मुंबई पाऊस अपडेट* *(29/08/2017 : 2.30 PM)*
- मुंबईतील पावसाचा जोर अजूनही कायम, अनेक ठिकाणी गुडघाभर साचलेलं पाणी कमरेपर्यंत वाढलं, तीनही रेल्वे मार्ग ठप्प, NDRF ची पथकं पुण्यावरुन मुंबईकडे रवाना https://gl/bBNaeP
- मुंबईत गेल्या तासाभरात 70 मिमी तर सकाळी 8.30 पासून 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद, केईएम रुग्णालयात पाणी शिरलं https://goo.gl/tscndK
- दादर टीटी, हिंदमाता परिसरात गळ्यापर्यंत पाणी, तर फूल मार्केटमध्ये पावसाच्या पाण्यात हार-फुले तरंगली, तुफान पावसाने अनेक कार्यालयांना सुट्टी, मात्र रेल्वेच नसल्याने घरी जाण्याची पंचाईत https://gl/bBNaeP
- बस अर्ध्या बुडाल्या तिथे टॅक्सी किंवा अन्य वाहने काय धावणार? मुंबईकरांसमोर प्रश्न, अनेक जण विविध स्टेशनवर जिथल्या तिथे अडकले https://gl/bBNaeP
- महापालिकेच्या शाळांना सुट्टी, डब्बेवाल्यांची सेवा खंडीत, रस्त्यावर अडकला असाल तर 100 नंबरशी संपर्क साधा, मुंबई पोलिसांचं आवाहन, तर मनपाकडून 1916 हेल्पलाईन नंबर जारी https://goo.gl/tscndK
- पाणी साचलेल्या परिसरातील गणेश मंडळांचा वीजपुरवठा खंडीत करा, दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचना,अत्यंत गरजेचं असेल तरच घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन https://goo.gl/tscndK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement