एक्स्प्लोर

'ऑपरेशन लुटारु'ची महापौरांकडून दखल, अॅम्ब्युलन्सद्वारे लूट करणाऱ्यांवर कारवाईची ग्वाही

मुंबईत खासगी अॅम्ब्युलन्स कंपन्यांकडून कोरोना रुग्णांची लूट होत असल्याचं एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालं होतं. मुंबईतल्या मुंबईत जाण्यासाठी दहा हजार रुपयांची आकारणी केली जात आहे. या प्रकाराची दखल आता महापौरांनी घेतली आहे.

मुंबई : मुंबईत खासगी अॅम्ब्युलन्स कंपन्यांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरु असल्याचं एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालं. या प्रकाराची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. लोकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देखील महापौरांनी दिली. मुंबईतल्या मुंबईत जाण्यासाठी खासगी अॅम्ब्युलन्स कंपन्यांकडून दहा हजार रुपयांची आकारणी होत असल्याचं 'एबीपी माझा'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलं होतं.

याविषयी महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "कोरोना संकटात आतापर्यंत विविध घटनांमधून माणुसकीचं दर्शन घडलं होतं. पण सध्या लोकांनी आपली माणुसकी कशाप्रकारे विकली आहे हे एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमधून दिसलं. लोकांना पैशांची गरज आहे, पण याचा अर्थ असा नाही की 10-20 किमी अंतरासाठी तुम्ही अॅम्ब्युलन्ससाठी वाटेल तेवढे पैसे घ्याल. राज्य सरकारने दर निश्चित करुनही अशा तक्रारी प्राप्त होत असतील तर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई व्हायला हवी."

मुंबई महापालिकेने अॅम्ब्युलन्स वाढवल्या आहेत. शिवाय आणखी काही अॅम्ब्युलन्स बीएमसीकडून घेण्यात येत आहेत. त्यामुळे आपण पूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. पण या काळात ज्यांनी माणुसकी विसरुन धंदा सुरु केला आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे, असंही त्यांनी म्हटलं.

ऑपरेशन लुटारु - एबीपी माझा स्टिंग ऑपरेशन

मुंबईत एकीकडे मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत दुसरीकडे कोरोना रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणाऱ्या अनेक खाजगी अॅम्ब्युलन्सकडून मोठी लूट सुरु असल्याचं एबीपी माझाने उघड केलं. रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीने मागील जुलै महिन्यात अॅम्ब्युलन्सने अव्वाच्या सव्वा दर लावू नये यासाठी दर निश्चिती केली होती. त्यानुसार एमएमआर रिजनमध्ये साध्या अॅम्ब्युलन्ससाठी 14 रुपये प्रतिकिमी किंवा मग 700 रुपये 24 तासांसाठी तर आयसीयू एअर कंडिशन अॅम्ब्युलन्ससाठी 24 रुपये प्रतिकिमी किंवा मग 1190 रुपये 24 तासासाठी तर कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सबाबत यामध्ये फारशी स्पष्टता नव्हती.

गरजेच्या वेळी सरकारी रुग्णवाहिका मिळत नसताना खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णाला घेऊन जाण्याशिवाय नसतो, त्यातच ही लूट केली जात आहे.

अॅम्ब्युलन्सचे दर

मुलुंड ते जोगेशवरी 20 किमी अंतर
खाजगी कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सचे दर - साडे आठ हजार
साध्या ऑक्सिजन अॅम्ब्युलन्सचे दर - चार हजार

बीकेसी ते सायन रुग्णालय अंतर 3 किमी
खाजगी कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सचे दर -5 हजार 
साधी ऑक्सिजन अॅम्ब्युलन्सचे दर - 3 हजार

कस्तुरबा ते जोगेश्वरी अंतर 30 किमी
कार्डिअॅक अम्ब्युलन्सचे दर - 8 हजार 
साध्या ऑक्सिजन अॅम्ब्युलन्सचे दर - साडे तीन हजार

बीकेसी ते दहिसर अंतर 60 किमी
कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सचे दर - 10 हजार
ऑक्सिजन अॅम्ब्युलन्सचे दर - 7 हजार

केईएम ते जोगेश्वरी अंतर 20 किमी 
कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सचे दर - 7 हजार
साध्या ऑक्सिजन अॅम्ब्युलन्सचे दर - 4 हजार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget