एक्स्प्लोर

ABP Majha Impact : पाय गमावलेल्या साक्षीच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले, महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतली भेट

रायगडमधील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे एका लहानग्या बाळाला वाचवायला गेलेल्या साक्षीच्या पायावर भिंत पडली आणि तिने तिचा एक पाय कायमचा गमावला. तिच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई : रायगडमधील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथील साक्षी दाभेकरला पायावर उभं करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. दरड कोसळलेल्या घरातल्या बाळाला वाचवताना पाय गमावलेल्या क्रीडापटू साक्षी दाभेकरला कृत्रिम पाय मिळणार आहे. एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीनंतर मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाकडून साक्षीचा पुढील उपचारासाठीचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. तसेच, कृत्रीम पाय बसवण्याची जबाबदारीही मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाने घेतली आहे.

सुरुवातीला साक्षीला जयपूर फुट बसवला जाणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी जर्मन कंपनीचा ऑटोबोक कंपनीचा सोर्बो रबरचा कृत्रीम पाय बसवला जाणार आहे. याचा खर्च 12 लाखांपर्यंत होणार आहे, याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेनं उचलली आहे. याशिवाव बीएमसी महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्यसमिती अध्यक्ष, नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याकडून एकूण सव्वा लाखाची रक्कम तातडीची मदत म्हणून साक्षीच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.

पोलादपूर तालुक्यातल्या सावित्री खोऱ्यात अतिदुर्गम डोंगरात वसलेलं केवनाळे गावातली साक्षी दाभेकर ही नववीत शिक्षण घेत आहे. साक्षी तालुक्यात उत्तम धावपटू, कब्बडी आणि खोखो खेळणारी खेळाडू म्हणून ओळखली जाते. मात्र, जेव्हा रायगडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु होतं त्यावेळी एका लहानग्या बाळाला वाचवायला गेलेल्या साक्षीच्या पायावर भिंत पडली आणि तिने तिचा एक पाय कायमचा गमावलाय.

पावसाच्या रूपाने अस्मानी संकट या सावित्री खोऱ्यात कोसळत होते. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी गेणू दाभेकर आणि त्यांच्या शेजारच्या चार घरांवर एक दरड कोसळली. शेजारच्या घरातल्या  नवजात बालकाचा टाहो ऐकला आणि साक्षीनं एका उडीतच तिने शेजारच्या उफाळे कुटुंबाचे घर गाठलं आणि समोर दिसणाऱ्या बाळावर ती उपडी पडली. बाळ वाचलं पण,  पुढच्याच मिनिटाला साक्षीने सुद्धा जोरात किंकाळी फोडली. त्या घराची अर्धी भिंत तिच्या पायावर कोसळली होती. 

साक्षीचे वडील नारायण दाभेकर यांना एकूण तीन मुली. कोरोना संकटामुळे हॉटेलमधली नोकरी होती ती सुटली. इतरांच्या शेतावर जाऊन मोलमजुरी करून मुलींना शिकवून मोठं करण्याचं त्याचं स्वप्नं आहे. त्यात लहानपणापासूनच धाडसी असलेल्या साक्षी चांगली खेळाडू होईलच हा विश्वास त्यांना होता. पण, साक्षीच्या धाडसानं आज या पित्याची मान उंचावलीसुद्धा आणि भविष्याच्या चिंतेनं त्याला ग्रासलंय सुद्धा.

साक्षीने केलेलं धाडस बघून सर्वांचाच थरकाप झाला. साक्षीने योग्य वेळीच झेप घेतल्याने बाळ सुखरुप राहिलं. पण, भिंतीखालचा दबलेला पाय काढला तेव्हा त्याची नस अन् नस तुटलेली होती. उपचारासाठी कुठे न्यावं तर गावात असलेल्या दोनच रिक्षा आणि त्या ही चिखलात रुतलेल्या होत्या. अशा स्थितीत केवनाळे गावातून  तीन तास चिखल तुटवत चालतच साक्षीला हाताच्या पाळण्यात घेऊन गावकऱ्यांनी तालुक्याच्या रुग्णालयात पोहोचवलं. मात्र, तिथे उपचार होणं शक्यच
 नव्हतं. त्यानंतर साक्षीला घेऊन तिच्या नातलगांनी मुंबई गाठली आणि केईएम हॉस्पिटलमध्ये तिला आणलं. साक्षीला या सगळ्यात ऑपरेशन करुनही पाय गमवावाच लागला. तिला पुन्हा कृत्रीम पायांवर उभं राहण्यासाठी अनेक मदतीच्या हातांची गरज आहे.

साक्षी नारायण दाभेकरला आर्थिक मदत करण्यासाठी बँक तपशील खालीलप्रमाणे आहे.

प्रतीक्षा नारायण दाभेकर
बँक ऑफ इंडिया, पोलादपूर शाखा,
A/C No. 120310510002839
IFSC code - BKID 0001203
MICR - 402013520
संपर्क - 8291813078

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : 'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
Maharashtra Assembly Elections 2024 : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
Sanjay Raut : 'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : दिल्लीच्या बैठकीत अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्नABP Majha Headlines :  1 PM : 19 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRamesh Chennithala : ठाकरेंची आणि मविआची तब्येत ठीक - रमेश चेन्नीथलाAjit Pawar Trimbakeshwar : अजित पवारांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : 'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
Maharashtra Assembly Elections 2024 : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
Sanjay Raut : 'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
Maharashtra Assembly Elections 2024 : अनिल पाटलांचं टेन्शन वाढलं, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून बड्या नेत्याने ठोकला शड्डू!
अनिल पाटलांचं टेन्शन वाढलं, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून बड्या नेत्याने ठोकला शड्डू!
Mumbai Local Titwala : चाकरमान्यांनो लक्ष द्या... मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं, टिटवाळा अपघाताचा परिणाम मुंबई लोकलवर कायम
चाकरमान्यांनो लक्ष द्या... मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं, टिटवाळा अपघाताचा परिणाम मुंबई लोकलवर कायम
Embed widget