Aarey Carshed Protest : आरे कारशेडप्रकरणी आंदोलन, पर्यावरणप्रेमींसह वंचित बहुजन आघाडीचा एल्गार
Aarey Carshed Protest : मुंबईतील आरे जंगलातील मेट्रो कारशेडला पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम आहे. आरेतील कारशेडप्रकरणी आज आंदोलन सुर आहे.
Aarey Carshed Protest : मुंबईतील आरे जंगलातील मेट्रो कारशेडला पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम आहे. आरेतील कारशेडप्रकरणी आज आंदोलन पुकारण्यात आलं. पर्यावरणप्रेमींसह वंचित बहुजन आघाडीनंही या आंदोलनात भाग घेतल्याचं पाहायला मिळालं. पर्यावरण प्रेमींनी यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि निर्णय बदलण्याची मागणी केली. तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरेप्रकरणावरुन राज्य सरकारचा जोरदार निषेध केला.
आरे जंगलात अनेक पर्यावरणप्रेमींसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दाखल झाले. याशिवाय आंदोलनाला आम आदमी पक्षाचाही पाठिंबा आहे. आप कार्यकर्ते झाडांना राखी बांधत आंदोलनं करणार आहेत. आरे जंगलातील वृक्षतोड आणि मेट्रो कारशेडला पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम आहे. दरम्यान आरेमध्ये पुढील निर्देशापर्यंत कोणतीही वृक्षतोड न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई मेट्रोच्या आरेतील कारशेडविरोधातील पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे, तोपर्यंत वृक्षतोड थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या वतीनं बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिकाकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप तुषार मेहतांनी केला आहे.
या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने या प्रकरणाची सविस्तर सुनावणी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या प्रकरणाची सुनावणी योग्य खंडपीठासमोर घेण्याबाबत 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होईल असे खंडपीठाने म्हटले. दरम्यान, न्यायमूर्ती ललित यांनी सुनावणी दरम्यान या प्रकरणाची सुनावणी इतर खंडपीठासमोर घेण्याबाबत म्हटलं आहे. गोदावर्मन थिरुमलपाड जंगल प्रकरणात (ज्यामध्ये न्यायालयाने जंगलांचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले होते) सर्वोच्च न्यायालयाचे अॅमिकस क्युरी म्हणून त्यांनी मदत केली होती. त्यामुळे आम्ही जंगलाच्या मुद्यांवर सुनावणी घेणाऱ्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवण्याबाबत विचार करत असल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Supreme Court On Aarey : आरेमध्ये वृक्षतोड करू नका, सुप्रीम कोर्टाचे मुंबई मेट्रोला आदेश
- Aarey Metro Carshed: आरे कारशेड परिसरातील झाडांवर कुऱ्हाड नाही, जेसीबीच चालवला; व्हिडिओ व्हायरल, चर्चांना उधाण
- Aarey Metro Carshed : आरे मेट्रो कारशेडसाठी झालेल्या झाडांच्या कत्तलीविरोधात संताप; शेकडोंची निदर्शने