परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या क्रिकेट बुकीविरोधात गुन्हा दाखल, 50 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा होता आरोप
Parambir Singh : भारतातील सट्टा बाजारातील मोठे नाव असलेला बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड, केतन तन्ना आणि जय तन्ना यांच्या तक्रारीवरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या क्रिकेट बुकी सोनू जलान, केतन तन्ना, जय तन्ना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतातील सट्टा बाजारातील मोठे नाव असलेला बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड, केतन तन्ना आणि जय तन्ना यांच्या तक्रारीवरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोप असणाऱ्या विकास दाभाडे यांच्या तक्रारीनुसार ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भादवी कलम 384, 389 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटकारस्थान करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे सोनू जालान?
सोनू जालान हा मुंबईच्या सट्टा बाजारातील मोठा सट्टेबाज असून त्याचे परदेशातही अनेक ग्राहक आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि सौदी अरेबिया या ठिकाणच्या ग्राहकांशी तो सतत संपर्कात असतो. तर भारतात त्याची मोठी टोळी असून ते दिल्ली, कोलकाता, राजस्थान, गुजरात, हरयाणा येथून त्याचे पंटर्स सट्टा खेळतात. सोनू जालान हा कांदिवली येथील अग्रवाल रेसिडन्सी येथे राहत असून त्याला मुंबई पोलिसांनी अनेकदा क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.