एक्स्प्लोर
67 आयफोन, 57 मोबाईलसह मुंबई विमानतळावर दोघं अटकेत

मुंबई : 67 नवेकोरे आयफोन आणि 57 जुने फोन घेऊन भारतात आलेल्या एका व्यक्तीला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने कारवाई केली. 67 आयफोन आणि 57 इतर जुने फोन घेऊन मोहम्मद युनुसमिया हा भारतीय नागरिक शुक्रवारी मुंबईत आला. सर्व फोन प्लास्टिकच्या पिशवीत बांधून त्याने मोठ्या बॅगेत लपवले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व फोनची किंमत 43 लाख 18 हजार रुपये इतकी आहे. मोहम्मद दक्षिण आफ्रिकेहून इथियोपियन एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ET610 ने मुंबईत आला. त्यानंतर कस्टम विभागाच्या तपासणीत ही बाब समोर आली. दरम्यान मोहम्मदसह त्याला विमानतळावर घेण्यासाठी आलेल्या एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























