एक्स्प्लोर

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 61 वर्षीय आलेक्स कोरीयांचा गुदमरुन मृत्यू

आलेक्स हे गेली ५० वर्ष एल्फिन्स्टनच्या याच पुलावरुन ये-जा करायचे. पण आज मात्र, त्या दुर्दैवी घटनेत त्यांचा गुदमरुन जीव गेला.

वसई : एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत वसईचे ६१ वर्षीय आलेक्स सिल्वेस्टर कोरीया यांचा आज (शुक्रवार) दुर्दैवी मृत्यू झाला. आलेक्स हे  वसईच्या नंदाखाल परिसरातील आडले  गावातील रहिवाशी होते. आलेक्स हे दररोज आपल्या वाडीतील फुलं घेऊन ती विकण्यासाठी दादरला येत असे. आज सकाळी फुलं विकून घरी परतत असताना त्यांचा या दुर्दैवी बळी गेला. त्यांना २ मुलं असून एका मुलाच्या येत्या जानेवारी  महिन्यात विवाह होणार होता. मात्र, या घटनेनं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. गावातील अनेक लोकांनी त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी बरीच गर्दी केली होती. आलेक्स हे गेली ५० वर्ष एल्फिन्स्टनच्या याच पुलावरुन ये-जा करायचे. पण आज मात्र, त्या दुर्दैवी घटनेत त्यांचा गुदमरुन जीव गेला. नेमकी घटना काय? मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर  मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरुन आणि चिरडून 22 जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे आणि राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे, तर जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. गरज पडल्यास जखमींना उपचारांसाठी इतरत्र हलवण्यात येईल, असंही मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. संबंधित बातम्या : कुटुंबाचा एकमेव आधार हरपला, मयुरेशचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना अतिशय धक्कादायक : मुख्यमंत्री बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या! एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं? एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी मते चोरून सत्ता मिळवली, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, लवकरच हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करू, निवडणूक आयुक्तांचे मत चोरांना संरक्षण; राहुल गांधींचा गर्भित इशारा
मोदींनी मते चोरून सत्ता मिळवली, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, लवकरच हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करू, निवडणूक आयुक्तांचे मत चोरांना संरक्षण; राहुल गांधींचा गर्भित इशारा
H1B Visa:  '24 तासाच्या आता अमेरिकेत दाखल व्हा' H1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टची वॉर्निंग, ट्रम्प यांच्या एका निर्णयानं घडामोडींना वेग
'24 तासाच्या आता अमेरिकेत दाखल व्हा' H1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टची वॉर्निंग
पुण्यातील एमआयटी कॉलेज परिसरात आढळला मृतदेह, विद्यार्थ्यांची धावाधाव; पोलिसांनी घेतला शोध
पुण्यातील एमआयटी कॉलेज परिसरात आढळला मृतदेह, विद्यार्थ्यांची धावाधाव; पोलिसांनी घेतला शोध
Zubeen Garg: जुबीन गर्ग सिंगापुरला गायला नाही तर फिरायला आले होते स्वतःच टीमला..., आयोजकांचा खळबळजनक दावा
जुबीन गर्ग सिंगापुरला गायला नाही तर फिरायला आले होते स्वतःच टीमला..., आयोजकांचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी मते चोरून सत्ता मिळवली, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, लवकरच हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करू, निवडणूक आयुक्तांचे मत चोरांना संरक्षण; राहुल गांधींचा गर्भित इशारा
मोदींनी मते चोरून सत्ता मिळवली, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, लवकरच हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करू, निवडणूक आयुक्तांचे मत चोरांना संरक्षण; राहुल गांधींचा गर्भित इशारा
H1B Visa:  '24 तासाच्या आता अमेरिकेत दाखल व्हा' H1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टची वॉर्निंग, ट्रम्प यांच्या एका निर्णयानं घडामोडींना वेग
'24 तासाच्या आता अमेरिकेत दाखल व्हा' H1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टची वॉर्निंग
पुण्यातील एमआयटी कॉलेज परिसरात आढळला मृतदेह, विद्यार्थ्यांची धावाधाव; पोलिसांनी घेतला शोध
पुण्यातील एमआयटी कॉलेज परिसरात आढळला मृतदेह, विद्यार्थ्यांची धावाधाव; पोलिसांनी घेतला शोध
Zubeen Garg: जुबीन गर्ग सिंगापुरला गायला नाही तर फिरायला आले होते स्वतःच टीमला..., आयोजकांचा खळबळजनक दावा
जुबीन गर्ग सिंगापुरला गायला नाही तर फिरायला आले होते स्वतःच टीमला..., आयोजकांचा खळबळजनक दावा
Nashik Crime : त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला; छगन भुजबळांकडून तीव्र निषेध, दोषींवर कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना
त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला; छगन भुजबळांकडून तीव्र निषेध, दोषींवर कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना
Video: जसे काका तसा पुतण्या? रोहित पवारांच्या 'दमबाजीच्या व्हायरल व्हिडिओवरुन अंजली दमानियांचा संताप
Video: जसे काका तसा पुतण्या? रोहित पवारांच्या 'दमबाजीच्या व्हायरल व्हिडिओवरुन अंजली दमानियांचा संताप
अतिवृष्टीनं बळीराजा उध्वस्त, बीडमध्ये जमीन अक्षरशः खरडून निघाली, हिंगोली, लातूरमध्येही मोठा फटका
अतिवृष्टीनं बळीराजा उध्वस्त, बीडमध्ये जमीन अक्षरशः खरडून निघाली, हिंगोली, लातूरमध्येही मोठा फटका
Kolhapur News: भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची कोल्हापुरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा; पट्टा घातलेल्या पाळीव श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची कोल्हापुरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा; पट्टा घातलेल्या पाळीव श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो
Embed widget