एक्स्प्लोर

अतिवृष्टीनं बळीराजा उध्वस्त, बीडमध्ये जमीन अक्षरशः खरडून निघाली, हिंगोली, लातूरमध्येही मोठा फटका

बीडमध्ये जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांपैकी 20 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात पाणी भरलंय. 

 Marathwada Rain Update:महाराष्ट्रच्या मराठवाडा व कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस जिल्ह्यांना झोडपून काढत आहे. सोलापूर, बीड, हिंगोली आणि लातूरमध्ये शेतकरी, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय.  नदीकाठच्या गावांत शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, पूल उध्वस्त झाले आणि विद्युत पोल आडवे झाले. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. बीडमध्ये जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांपैकी 20 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात पाणी भरलंय. 

बीडमध्ये नदीकाठच्या गावांमध्ये शेतजमिनी वाहून गेल्या

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घाटशीळ, पारगाव या गावांमधून वाहणाऱ्या किना नदीकाठी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या शेतजमिनीसह खरिपातील कापूस, तुर, उडीद, सिताफळ, केळी या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आता सरकारी मदतीकडे आशा लावून आहेत. आमच्या प्रतिनिधीने या गावातून आढावा घेतला असता, शेतातील पाणी अजून ओसरलेले नाही आणि पीक पूर्णतः नष्ट झालेले दिसत आहे.

हिंगोली: सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान

हिंगोली जिल्ह्यातील शेवाळा गावात कयाधू नदीचा पूर शिवारात शिरल्यामुळे सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे पावणेतीन लाख हेक्टर पिकं या मुसळधार पावसामुळे बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सोयाबीन पीक वाहून गेल्याने आता या पिकातून काहीही उत्पादन मिळणार नाही. शेतकऱ्यांना या पिकांचा बाहेर काढण्यासही खर्च करावा लागणार आहे.

लातूर: पूल उध्वस्त, वाहतूक ठप्प

लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांपैकी 20 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात पाणी भरले. जिल्ह्यातील 27 पूल पाण्याखाली गेले, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. हासाळा ते शिंदाळा मार्गावरील पूल गेला असून तावरजा नदीला मिळणाऱ्या ओढ्याचे प्रवाह बदलले. आता पाणी हळूहळू ओसरल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे, मात्र शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांचं पीक पाण्यात, मैलोनमैल चिखल 

सोलापूर, बीड, हिंगोली व लातूरमध्ये शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेती पीक, रस्ते, पुलं आणि सार्वजनिक मालमत्तेवर येणारा फटका कोट्यावधी रुपयांचा ठरतो. प्रशासनाने तातडीने पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आणि शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची गरज आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर

व्हिडीओ

Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
Embed widget