एक्स्प्लोर

मोदींनी मते चोरून सत्ता मिळवली, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, लवकरच हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करू, निवडणूक आयुक्तांचे मत चोरांना संरक्षण; राहुल गांधींचा गर्भित इशारा

Rahul Gandhi on PM Modi: केरळमधील वायनाडमध्ये राहुल म्हणाले की, आमच्याकडे 100 टक्के पुरावे आहेत. लवकरच, आम्ही एक 'हायड्रोजन बॉम्ब' फोडू जो संपूर्ण सत्य देशासमोर आणेल.

Rahul Gandhi on PM Modi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मतचोरीवर सडकून प्रहार करताना गर्भित इशारा दिला. माझ्याकडे मते चोरीचे पुरावे असून ते लवकरच जाहीर करतील. त्यानंतर, मोदींनी मते चोरी करून सत्ता मिळवली यावर कोणीही शंका घेणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. केरळमधील वायनाडमध्ये राहुल म्हणाले की, आमच्याकडे 100 टक्के पुरावे आहेत. लवकरच, आम्ही एक 'हायड्रोजन बॉम्ब' फोडू जो संपूर्ण सत्य देशासमोर आणेल. आम्ही कधीही पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही. यावेळीही आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, मागील पत्रकार परिषदेत काँग्रेसने मतदार यादीतील हेराफेरीची उदाहरणे देखील दिली होती. महादेवपुरा आणि अलांदमध्ये चुकीच्या पद्धतीने मते जोडण्याच्या आणि वगळण्याच्या घटना दाखवण्यात आल्या. राहुल यांनी सांगितले की, "मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार मत चोरांना संरक्षण देत आहेत. अलांद विधानसभा मतदारसंघातील 6 हजार मतदारांची नावे वगळण्याच्या प्रयत्नाचे प्रकरण सीआयडी चौकशीत आहे. ही चौकशीच सीईसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. राहुल म्हणाले की, मी देशासमोर सत्य आणेन. पंतप्रधान मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीशी त्यांचा हायड्रोजन बॉम्ब जोडला गेला आहे का असे विचारले असता, राहुल म्हणाले की अनुमान लावणे हे माध्यमांचे काम आहे. त्यांचे काम देशासमोर सत्य आणणे आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुल यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे फेटाळून लावले. त्यात म्हटले आहे की, कोणताही सामान्य नागरिक ऑनलाइन कोणाचेही मत वगळू शकत नाही. एखाद्याचे मत वगळण्यापूर्वी, संबंधित व्यक्तीला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते.

भारताचा पंतप्रधान कमकुवत आहे

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसासाठी वार्षिक शुल्क $100,000 (अंदाजे 88 लाख) पर्यंत वाढवले ​​आहे. एच-1बी व्हिसा शुल्क वाढीमुळे भारतीयांना सर्वाधिक दणका बसला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी पुन्हा सांगतो, भारताचा पंतप्रधान कमकुवत आहे." राहुल गांधी यांनी 5 जुलै 2017 रोजी सोशल मीडिया एक्सवरील पोस्टचा संदर्भ दिला. त्या पोस्टमध्ये राहुल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर एच-1बी व्हिसाचा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी म्हणाले होते की, भारताचा पंतप्रधान कमकुवत आहे. आता, त्यांनी पुन्हा एकदा एच-1बी व्हिसा शुल्क वाढीवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

गोवा विधानसभा निवडणूक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी, नेमकी कोणत्या नेत्यांची नियुक्ती  
गोवा विधानसभा निवडणूक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी, नेमकी कोणत्या नेत्यांची नियुक्ती  
Delimitation Bill : उत्तर प्रदेशात 40 तर महाराष्ट्रात 24 खासदार वाढणार, नव्या विधेयकानुसार प्रत्येक राज्यात किती वाढ? जाणून घ्या आकडेवारीचे टेबल
उत्तर प्रदेशात 40 तर महाराष्ट्रात 24 खासदार वाढणार, नव्या विधेयकानुसार प्रत्येक राज्यात किती वाढ? जाणून घ्या आकडेवारीचे टेबल
Delimitation Bill Copy : मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कॉपी खासदारांच्या हाती, लोकसभेत नेमक्या किती जागा वाढणार याचा आकडा समोर
मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कॉपी खासदारांच्या हाती, लोकसभेत नेमक्या किती जागा वाढणार याचा आकडा समोर
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
शरद पवारांच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
Embed widget