एक्स्प्लोर
Kolhapur News: भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची कोल्हापुरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा; पट्टा घातलेल्या पाळीव श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो
Gopichand Padalkar: राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं गळ्यात आमदार पडळकर यांचा फोटो घातलेला श्वानही या आंदोलनात सहभागी झाला होता.
Gopichand Padalkar symbolic funeral procession in Kolhapur
1/10

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आज प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
2/10

राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं
3/10

गळ्यात आमदार पडळकर यांचा फोटो घातलेला श्वानही या आंदोलनात सहभागी झाला होता
4/10

पडळकरांच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत दसरा चौक परिसर दणाणून सोडला.
5/10

विधिमंडळातून आमदार पडळकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
6/10

दुसरीकडे, जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विकृत पातळीवरील टीकेनंतर ईश्वरपूर (इस्लामपूर) आणि आष्टा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
7/10

काल सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
8/10

वाचाळवीर आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून करण्यात येत आहे.
9/10

टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.
10/10

. परंतु, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.
Published at : 20 Sep 2025 02:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























