पुण्यातील एमआयटी कॉलेज परिसरात आढळला मृतदेह, विद्यार्थ्यांची धावाधाव; पोलिसांनी घेतला शोध
सुभाष कामठे मूळचे पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहण्यास असल्याची प्राथमिक माहिती असून ते गेल्या 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता होते.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनी चर्चेत असलेल्या पुण्यातील (Pune) एका महाविद्यालय परिसरात वयस्कर व्यक्तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील एमआयटी महाविद्यालयाच्या (College) कॅम्पसमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. सुभाष कामठे असे 65 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सुभाष कामठे मूळचे पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहण्यास असल्याची प्राथमिक माहिती असून ते गेल्या 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. तसेच, कामठे यांना दारूचे देखील व्यसन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. शुक्रवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आलीय, याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, दारुच्या नशेत पाण्यात उडी घेत संबंधित व्यक्तीने आमहत्या केल्याची चर्चाही परिसरात होत आहे.
हेही वाचा
Video: जसे काका तसा पुतण्या? रोहित पवारांच्या 'दमबाजीच्या व्हायरल व्हिडिओवरुन अंजली दमानियांचा संताप























