एक्स्प्लोर
Advertisement
LIVE: जय जवानचा नवा विक्रम, 1 मिनिट 3 सेंकदात नऊ थरांची सलामी
राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. गोविंदा पथकं थरावर थर रचत आहेत.
मुंबई: दहीहंडीवरील बंदी उठवल्यानंतर सर्वत्र गोविंदांचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाले आहेत.
- ठाण्यातील वर्तकनगरमध्ये 'संस्कृती'च्या प्रो दहीहंडीमध्ये जय जवान मंडळानं अवघ्या 1 मिनिट 3 सेंकदात नऊ थरांची सलामी देऊन एक नवा विक्रम रचला आहे. दरवर्षी जय जवान मंडळ नऊ थर लावतं यंदाही त्यांनी हा प्रताप पुन्हा एकदा करु दाखवला आहे. जय जवान मंडळ हे जोगेश्वरीचं आहे.
- दहीहंडीत आजवर माजगाव ताडवाडी आणि जय जवान या मंडळांचा दबदबा कायम होता. पण यंदा बोरीवलीच्या शिवसाई मंडळानं ठाण्यातील नौपाडामध्ये मनसेच्या दहीहंडीत नऊ थर रचून विक्रमाशी बरोबरी केली आहे. यावेळी त्यांनी तब्बल 11 लाखांचं बक्षीस पटकावलं आहे.
- बोरीवलीच्या शिवसाई मंडळाची ठाण्यातील नौपाड्याच्या दहीहंडीत 9 थरांची सलामी
- मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला असताना कोकणातले पाहुणेही ठाण्यात दहीहंडी बघण्यासाठी दाखल झाले आहेत. यात त्यांनी खास मालवणी भाषेत गोविंदांच्या सुरक्षेसाठी गाऱ्हाणं घेतलं आहे.
VIDEO : अभिनेता सुबोध भावेसोबत दहीहंडीचं सेलिब्रेशन
- फुटबॉलचं यजमान पद पहिल्यांदाच भारताला मिळाल्यानं ठाण्यामध्ये फुटबॉलच्या आकाराची हंडी बांधण्यात आली. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात ही हंडी उभारण्यात आली होती, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूजा केल्यानंतर दहीहंडीच्या सोहळ्याला सुरूवात झाली
- ठाण्यातल्या वर्तकनगरमध्ये प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडीमध्ये सहा थरांची सलामी
VIDEO : 'कच्चा लिंबू'ची टीम एबीपी माझाच्या न्यूजरुममध्ये
- 9 थर लावण्यासाठी तिकडं मोठमोठी गोविंदा पथकं तयार असताना एबीपी माझाच्या रणरागिणीही पुढे सरसावल्यात आहेत. माझाच्या प्रतिनिधी अक्षरा चोरमारे आणि मनश्री पाठक यांनी दहीहंडीला सलामी दिली.
- जय जवान पथकानं यंदाही ९ थर आणि जमल्यास 10वा थरही लावण्याचा निश्चय केला आहे.
VIDEO : 'माझा'च्या न्यूजरुममध्ये सावनी रवींद्रसोबत स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडीचं सेलिब्रेशन
- ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत जय जवान मंडळाचा नऊ थर रचण्याचा पहिला प्रयत्न फसला
- ठाण्यातील नौपाडामध्ये महिला पथकानं दिली सहा थरांची सलामी
- दादरमध्ये आठ थरांची सलामी
दादर, घाटकोपर, जोगेश्वरी, ठाणे अशा अनेक भागात दहीहंडीची तयारी पूर्ण झाली आहे. ठाण्यात 9 थर लावणाऱ्या गोविदांसाठी 11 लाख तर घाटकोपरमध्ये 25 लाखांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. हे पारितोषिक मिळवण्यासोबतच गोविंदांच्या सुरक्षेसाठीही तयारी केल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
आयोजकांकडूनही हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गियर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement