एक्स्प्लोर
दहा हजारासाठी बापाकडून 2 वर्षाच्या मुलाची हत्या
भिवंडी: दहा हजार रुपयांसाठी पोटच्या 2 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना कल्याणजवळील भिवंडीत घडली आहे. अमीन बानो असं मृत मुलाचं नाव असून आरोपी हाशिमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हाशिमचा तीन वर्षापूर्वी परविन बानोशी विवाह झाला. त्यांना अमीन हा दोन वर्षाचा मुलगा होता. मात्र, सहा महिन्यापूर्वी हाशिम आणि परविनचा घटस्फोट झाला. मात्र, मुलगा अमीनचा ताबा हाशिमकडे दिला. त्यानंतर आठवड्यातून कधी तरी मुलाला घेऊन परविनकडे जात होता.
काही दिवसापूर्वी हाशिमनं 10 हजार घेऊन परविनला घरी येण्यास सांगितलं. पण परविननं घरी येण्यास नकार दिला. चिडलेल्या हाशिमनं आपल्याच पोटच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पळून जाण्याच्या नादात असलेल्या हाशिमला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान याप्रकरणी पोलीसांनी हाशिमला अटक केली असून पुढील चौकशी करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement