एक्स्प्लोर
विरारमध्ये दारुड्यांचा पोलिसावर हल्ला
विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना मारहाण करण्याची ही तिसरी घटना आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी एका महिला पोलीस अधिकाऱ्यांशी अश्लिल हावभाव करुन विनयभंग केला होता. त्यानंतर विरार पूर्वेकडील मनवेलपाडा तलावावर तर पोलिसाला सर्वांसमोर मारहाण केली होती. आणि ही तीसरी घटना घडली आहे. त्यामुळे आता पोलीसचं सुरक्षीत राहिले नसतील तर नागरीकांच काय हा प्रश्न आता समोर येत आहे.

विरार (ठाणे) : रस्त्यावर दारु पिण्यास बसलेल्या दारुड्यांना हटकल्याच्या कारणावरुन विरारमध्ये पोलिसाला धक्काबुकी करुन, त्याच्या हाताचा चावा घेतला. या प्रकरणात कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा करुन, त्यांच्या हाताला चावा घेतल्या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन आरोपीला अटक करण्यात आलं आहे. सतिश सुधाकर उंडे आणि योगेश हरिचंद्र लोखंडे अशी मारहाण करणाऱ्या दारुड्यांची नावं आहेत. सतिश हा मालाडला राहतो, तर योगेश हा नालासोपाऱ्यात राहतो. शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलिस शिपाई धनाजी घोरपडे विरार येथील बंदोबस्त संपवून वसईला जात होते. त्याचवेळी विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातील मोहक सिटीच्या पाठीमागील रोडवर अंधारात एका फोर व्हिलरच्या पाठीमागे संशयीत रित्या बसून यातील दोन आरोपी दारु पित बसल्याचे त्या पोलीस हवलदाराला दिसले होते. दारु पिणाऱ्यांना पोलिसांनी हटकले आणि पोलिस ठाण्यास येण्यास सांगितले, तर दारुच्या नशेत असणाऱ्या त्या दोघांनाही त्याचा राग आला आणि त्यांनी प्रथम पोलिसांशी वादावादी करुन, शिविगाळ आणि दमदाटी केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर सतिश ऊंडे या आरोपीने पोलिसांच्या उजव्या बाजूच्या कानाच्या खाली नखाने ओरखोडून डाव्या हाताच्या बोटाला चावाही घेतला आणि जबर दुखापत केली. या दोघांनाही विरार पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर जबर दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा करणे, शिविगाळ करणे या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केले. आज वसई न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडीही सुनावली आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना मारहाण करण्याची ही तिसरी घटना आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी एका महिला पोलीस अधिकाऱ्यांशी अश्लिल हावभाव करुन विनयभंग केला होता. त्यानंतर विरार पूर्वेकडील मनवेलपाडा तलावावर तर पोलिसाला सर्वांसमोर मारहाण केली होती. आणि ही तीसरी घटना घडली आहे. त्यामुळे आता पोलीसचं सुरक्षीत राहिले नसतील तर नागरीकांच काय हा प्रश्न आता समोर येत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























