एक्स्प्लोर
मराठवाड्यातील 100 तरुण आयसिसमध्ये?
मुंबई : जगभरात आयसिसचा प्रभाव वाढत असतानाच मराठवाड्यातील सुमारे 100 मुस्लीम युवक बेपत्ता असून ते आयसिसमध्ये दाखल झाल्याचा संशय शिवसेनेचे परभणीचे आमदार राहूल पाटील यांनी नुकताच व्यक्त केलाय. शिवसेनेच्या आमदाराने विधानसभेत असे मत व्यक्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसात आयसिसच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच परभणीच्या नासीरबीन चाऊसला नुकतीच आयसिसच्या संपर्कात आल्याच्या आरोपातून अटक झाली आहे. त्याने बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केल्याचाही खुलासा समोर आला आहे. त्यामुळे यावर आपले मत मांडताना शिवसेनेचे आमदार राहूल पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.
नासीरबीनला अटक झाल्यानंतर एमआयएम मुस्लिम तरूणांना भडकावत असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे. सोबतच एमआयएमची मान्यताच कायमस्वरूपी रद्द करावी अशीही मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement