एक्स्प्लोर

शेतकरी भावाला दिला मोठा हिस्सा, दोन प्राध्यापक भावांची 'आदर्श' वाटणी; आई बापाचे पांग फेडले, नात्याचं मोलही जपलं

कुठलाही वादविवाद न करता, अतिशय आनंदात हे सर्व घडले, तेही त्यांच्या आई-वडिलांसमोर.

Parbhani:आज भाऊ बंदकीमध्ये शेतवाटणीत एक एक इंचावरून भाऊ भावाचा जीव घेण्याचे, कोर्ट कचेऱ्या करून आयुष्यभर एकमेकांचे तोंडही बघितले जात नसल्याचे अनेक उदाहरण  दिसतात. मात्र यातच काही बोटावर मोजण्या इतके अशीही कुटुंब आहेत की जे जमिनीपेक्षा नात्याला मानतात. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील दहिफळे बंधूंनी शेटवाटणीत असाच एक आदर्श घालून दिलाय, ज्याची चर्चा राज्यभर होतेय. पाहुयात एक खास रिपोर्ट.

शेतकरी भावाला दिला मोठा हिस्सा

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील रंगनाथराव दहिफळे यांचे कुटुंब आहे. त्यांना 3 मुले आणि 1 मुलगी, नातवंड असा मोठा परिवार आहे. मोठा मुलगा प्रा. डॉ. बाळासाहेब आणि लहान मुलगा प्रा. युवराज हे दोघेही प्राध्यापक आहेत. मधला मुलगा केशव शेती करतात. वडिलांची एकूण 16.5 एकर जमीन, गावात घर, जागा असा प्रपंच आहे. 91 व्या वर्षी वडिलांनी “माझ्या डोळ्यासमोर तुमच्या वाटण्या व्हाव्यात” अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर तिन्ही भाऊ, त्यांच्या पत्नी, बहीण अशा सर्वांनी घरच्या घरी बसून वाटण्या केल्या.यामध्ये दोन्ही प्राध्यापक भावांनी, स्वतः नोकरीत असल्याने, शेती करणाऱ्या भावाला 16.5 एकर जमिनीपैकी 9.5 एकर जमीन दिली. स्वतःकडे 3-3 एकर जमीन ठेवली. एवढंच नव्हे, तर शेती करणाऱ्या भावाच्या मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. कुठलाही वादविवाद न करता, अतिशय आनंदात हे सर्व घडले, तेही त्यांच्या आई-वडिलांसमोर.

तिन्ही जावांचा हसत हसत पाठिंबा

सध्याच्या वातावरणात एकत्रित कुटुंब पद्धती ही खुप कमी राहिली आहे. त्यात दहिफळे कुटुंबाने एकत्रित कुटुंब पद्धती तर जपलीच, शिवाय नात्यातील गोडवाही कायम ठेवलाय. एवढा मोठा निर्णय घेताना घरातील महिलांचे विचार जुळणे हे अत्यंत महत्वाचे असते.  दहिफळे कुटुंबियातील महिलांनीही या निर्णयाला हसत हसत पाठींबा दिला. आमच्या कुटुंबात आम्ही बहिणीसारखे राहतो आणि जे काही निर्णय घ्यायचे ते सर्व जण मिळून घेतो असे तिन्ही जावा सांगतात.. 

साडे सोळा एकर मधील जी 9.5 एकर जमीन मधला भाऊ केशव दहिफळे यांच्या वाटणीला आलीय. ती जमीन पूर्णतः पाण्याखाली असुन 2 विहीर बोअर शेतात आहे. शिवाय साडे नऊ एकरमधली आंबराईही त्यांच्या हक्कात आलीय. तसेच मुलगा आणि मुलीचे शिक्षण आणि लग्नही नोकरदार भाऊच करणार असल्याने केशव आणि त्यांच्या पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झालाय..  

गावकऱ्यांनीही केलं अनोख्या वाटणीचं स्वागत

दरम्यान गंगाखेडच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या अडीच हजार लोकवस्तीच्या खादगावात विनावाद विना भांडणे केवळ वडिलांनी सांगणे आणि भावांनी ऐकून संपत्तीची वाटणी केली .केवळ वाटणीच नाही तर जो भाऊ आर्थिक कमजोर आहे, त्याला ही यातून उभे केले. ही आमच्या गावासाठीची अभिमानाची बाब असून दहिफळे कुटुंबियांनी दाखवलेल्या मार्गानेच आम्ही चालण्याचा प्रयत्न करू,  अशी ग्वाही गावकर्यांनी दिलीय. एकुणच दहिफळे बंधुंनी दाखवलेला वाटणीतील हा सामंजस्य आणि मनाचा मोठेपणा हा वाटणीमुळे कित्येक वर्षांपासून न्यायालयात भांडत असलेल्या भावांसाठी एक नवीन मार्ग मोकळा करणारा तर आहेच, शिवाय नवीन पिढीसमोरही एक आदर्श निर्माण करणारा म्हणावा लागेल...

Nagpur News: विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अखेर काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखान्याचा मार्ग मोकळा, 15 वर्षाच्या न्यायालयीन लढ्याला यश

महत्त्वाच्या बातम्या

Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार

व्हिडीओ

Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Embed widget