एक्स्प्लोर

धनंजय मुंडेंना मागणीचा अधिकार नाही; अंजली दमानियांनी धनुभाऊंना फटकारलं, निलम गोऱ्हेंची घेतली भेट

पोक्सोअंतर्गत गुन्हा झालेले दोन्ही आरोपी हे संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप आहे, यावरूनच धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत आमदार संदीप देशपांडे यांना कोंडीत पकडल्याचे दिसले होते.

Anjali Damania : बीडच्या खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट'ची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे . पोक्सोअंतर्गत गुन्हा झालेले दोन्ही आरोपी हे संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप आहे . दरम्यान, बीडमध्ये पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना लक्ष्य केलं . आरोपींच्या सीडीआर तपासा तसेच SIT स्थापन करा अशी मागणी केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यासारख्या व्यक्तीला मागणी करण्याचा अधिकारच नसल्याचं म्हणत  ही मागणी धनंजय मुंडेंकडून आली याचा धक्का बसल्याचं म्हटलं . 

बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडशी आर्थिक संबंध तसेच इतर गंभीर आरोपांनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता . बेल्स पाल्सी आजारामुळे धनंजय मुंडे मागील बरेच दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते .30 जून रोजी पत्रकार परिषदेत आपले मौन सोडून त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांची कोंडी केल्याचे दिसले .यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंना फटकारले आहे .

काय म्हणाल्या अंजली दमानिया ?

'आज नीलम गोरे यांची भेट घेतली .कारण खूप संताप झाला .काल धनंजय मुंडे यांनी मागणी केली म्हणून धक्का बसला .राग आला .त्यांची पात्रताच नाही .बीड लैंगिक छळ प्रकरणात संदीप क्षीरसागर दोषी असतील तर कारवाई झालीच पाहिजे .आमच्यासारखे अनेक सुशिक्षित लोक आहेत जे चौकशी करतील .धनंजय मुंडे यांना कोणताही अधिकार नाही . 'महाराष्ट्रात जिथे जिथे पिंक पथक आहे ,त्यामध्ये महिलांचा सहभाग नाही .मला ज्या दोन पथकांची माहिती द्यायची होती ती मी नीलम गोरे यांना दिली .बाकी सर्वेक्षण करा अशी मागणी ही शासनाकडे त्यांनी करावी .पिंक पथकामध्ये महिला असून त्यांचा धीर देण हे काम आहे .नीलम गोरे यांनीही आश्वासन दिले की त्या शासनाकडे मागणी करतील .बाकी धनंजय मुंडे यांना अधिकार नाही मागणी करण्याचा .धनंजय मुंडे सारख्या व्यक्तीला अधिकाराच नाही . असे अंजली दमानिया म्हणाल्या .

संदीप क्षीरसागरांचे धनंजय मुंडेंना प्रत्यूत्तर

संदीप क्षीरसागर म्हणाले की, त्यांची मागणी एसआयटीची आहे, त्याला मी सहमत आहे. जो प्रकार घडला तो चुकीचा घडला आहे. गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्या शिक्षकांना अटक झाली आहे. प्रशासनासोबत आम्ही चर्चा करतोय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. ते माझ्या जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका, असं मी सांगितलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करायला 10 दिवस लागले नाही. माझ्या जवळचे असले तरी पीडिताने तक्रार देताच गुन्हा दाखल झाला आहे. मी काही त्यांच्यासारखं 150 दिवस पळून गेलो नाही. त्यांचे मंत्रीपद गेल्याने त्यांना दुःख आहे. ते या प्रकरणात बोलताय तसेच मस्साजोग प्रकरणी त्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती.  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असे त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात धनंजय मुंडेंचा हल्लाबोल; धनुभाऊंनी संदीप क्षीरसागरांना पकडलं कोंडीत!

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget