एक्स्प्लोर
Special Report Maharashtra Language Policy Row: त्रिभाषा सूत्र, GR रद्द, नेत्यांच्या मुलांच्या English शाळेवरून राजकारण तापले
शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र आणि हिंदी शिकविण्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वाद सुरू होता. सरकारने संबंधित जीआर रद्द केल्याने विरोधकांचा रोष काही प्रमाणात कमी झाला. मात्र, हिंदी आणि मराठी अस्मितेवरून सुरू झालेले हे राजकारण आता नेत्यांच्या मुलांच्या शाळेपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना टोला लगावताना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या बॉम्बे स्कॉटिश या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा उल्लेख केला. यानंतर राज्यातल्या प्रमुख नेत्यांची मुले कोणत्या शाळेत शिकली, याची शोधाशोध सुरू झाली. हिंदी-मराठीवरून राजकारण करणाऱ्या जवळपास सर्वच नेत्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, "इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं आणि खऱ्या अर्थाने भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही." यावर मनसेने प्रतिसवाल केला की, बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकणे वाईट आहे का? त्यांनी भाजपच्या नेत्यांनाही त्यांच्या शाळांवरून प्रश्न विचारले. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना देशातील सर्व इंग्रजी आणि आंतरराष्ट्रीय शाळा बंद करण्याचा जीआर काढण्याचे आव्हान दिले. रोहित पवारांनी हा विषय वैयक्तिक पातळीवर न आणता धोरणात्मक मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र मुख्यमंत्र्यांचा मुद्दा उचलून धरत राज ठाकरेंना नातवंडांना मराठी शाळेत टाकण्याचा सल्ला दिला. ठाकरे बंधूंचा पाच जुलैचा विजयी मेळावा जवळ येत असताना, महायुतीकडून होणाऱ्या टीकेचा जोर वाढत आहे. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका आणि मुख्यमंत्र्यांनी बॉम्बे स्कॉटिश स्कूलवरून लगावलेला टोला यामुळे राजकीय टोलेबाजीला आणखी उधाण येण्याची चिन्हे आहेत. पाच जुलैनंतर राज ठाकरे कोणत्या राजकीय शाळेत प्रवेश घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र





















