एक्स्प्लोर
Special Report Thackeray Reunion: Hindi मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र, 5 तारखेला विजयी मेळावा
महाराष्ट्र हितासाठी जुने वाद विसरून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. येत्या पाच तारखेला होणाऱ्या विजयी मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झाले असले तरी त्यांच्या मतभेदाचा इतिहास मोठा आहे. २००३ मध्ये महाबळेश्वर येथे उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले, तेव्हा राज ठाकरेंनीच त्यांचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्याचवेळी दोन भावांमधील दुरावा वाढत गेला. १८ डिसेंबर २००५ रोजी राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ९ मार्च २००६ रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. मराठीच्या मुद्द्यावर मनसेने शिवसेनेच्या मराठी वोट बँकेत वाटेकरी निर्माण केला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १३ जागा जिंकल्या. २०१२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ७५ तर मनसेने २८ जागा जिंकल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंमधील वाद टोकाला पोहोचला. जाहीर भाषणांमध्ये एकमेकांवर शाब्दिक हल्ले झाले. राज ठाकरेंनी २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा दिला, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'लावरे तो व्हिडिओ' म्हणत मोदींविरोधात रान उठवले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. एप्रिल २०२२ मध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून लक्ष्य केले. "मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्राचं आहे, जनतेचं आहे, जे लोकांसमोर येणार आहे, मग ती गोष्ट तुम्ही चार भिंतीत का केली?" असे राज ठाकरेंनी म्हटले होते. २०२२ मध्ये राज्यात शिंदे सरकार आले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, ज्याची उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर इतिहासात रमल्याची टीका केली. आता महाराष्ट्र हितासाठी कटुता बाजूला ठेवून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. पाच तारखेनंतर ही एकी टिकणार का आणि ठाकरे ब्रँड भाजप आणि शिंदेंना वरचढ ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा





















