Mumbai Rain : मुंबई, ठाण्यासह पश्चिम उपनगरात धो-धो पावसाच्या सरी; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, राज्यासाठी हवामान विभागाचा अंदाज काय?
Mumbai Rain News: भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईच्या पश्चिम उपनगर, ठाण्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये सध्या दोन ते तीन फूट पाणी भरल्याचे चित्र आहे.

Mumbai Rain News : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळ पासून सुरु असलेल्या पावसाच्या दमदार सरीमुळे ठाण्यासह अंधेरी सबवेमध्ये सध्या दोन ते तीन फूट पाणी भरल्याचे चित्र आहे. यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम उपनगरात (Mumbai Rain) जे सखल भाग आहे त्या ठिकाणी देखील आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे. अशातच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सखल भागात ठिकठिकाणी पाणी भरला आहे. त्यासोबत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर देखील सखल भागात पाणी भरलं आहे. एकूणच या पावसामुळे सकाळी कामानिमित्य बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
काही तासांत मुंबईत पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता
पुढे आलेल्या माहितीनुसार, मुंबई पूर्व उपनगरात ही सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकातून ये जा करणाऱ्या चाकरमण्याना यामुळे दोन ते तीन फूट पाण्यातून प्रवास करावा लागतो आहे. मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप , मुलुंड , चेंबूर , गोवंडी परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुज वांद्रे या सर्व परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर साकीनाका परिसरामध्ये हि मोठ्या प्रमाणावर पाणी भरलेल आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी तो तात्पुरता बंद करण्यात आला होता. अशातच पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाची दांडी
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने नुकतेच पेरणी केलेली व उगवलेली पिके सुकू लागली आहेत अशातच सोयाबीन पिकावर हुमनी अळी ने आक्रमण केल्याने सोयाबीन पीक ही धोक्यात आल आहे त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकरी सोयाबीन पिकांवर रोटावेटोर फिरवून पीक नष्ट करत आहे. यामुळे मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा भार पडत आहे.
तर महत्वाच्या बातम्या
























