Pune Accident News : पुण्यात गेल्या तीन तासांत एकाच ठिकाणी तब्बल दहा अपघात; प्रशासनाची मलमपट्टी जीवावर बेतणारी; घटना सीसीटीव्हीत कैद
Pune Accident News : पुणे प्रशासनाचा गलथानपणा पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. कारण पुण्यात एका मार्गावर ते ही एकाच ठिकाणी गेल्या तीन तासांत तब्बल दहा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Accident News : पुणे प्रशासनाचा गलथानपणा पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. कारण पुण्यात एका मार्गावर ते ही एकाच ठिकाणी गेल्या तीन तासांत तब्बल दहा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण हे अपघात म्हणजे जणू ऍक्शन रिप्लेचं म्हणावे असे आहेत, जे सीसीटीव्हीत सुद्धा कैद झालेत. बरं या अपघातांना नेहमीप्रमाणे प्रशासनचं जबाबदार आहे, असा आरोप स्थानिकांनी केलाय.
पावसामुळं मुरुमचा चिखल झाला,प्रशासनाची मलमपट्टी जीवावर बेतणारी
मावळ तालुक्यातील देहू ते येलवाडी मार्गावर हे दहा अपघात एकाचं ठिकाणी झालेत. या मार्गावर प्रचंड खड्डे पडलेत, त्या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकतो आणि एखाद्याचा त्यात नाहक बळी जाऊ शकतो. म्हणून स्थानिकांनी खड्डे बुजवण्याची विनंती केली. तर प्रशासनाने मलमपट्टी म्हणून या खड्ड्यात मुरुम आणून भरला. बरं यामुळं तर आणखी भलतंच घडायला लागलं. पावसामुळं मुरुमचा चिखल झाला आणि तो रस्त्यावर पसरला. आता इथून प्रवास करणारे दुचाकीस्वार एकामागोमाग एक घसरुन जखमी होतायेत. त्यामुळं प्रशासनाने केलेली तात्पुरती मलमपट्टी ही कोणाच्या जीवावर बेतणारी ठरतेय. एखाद्याचा जीव जाण्याआधी प्रशासन यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा स्थानिकांना आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठे वाहतूक कोंडी
मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्गावर सांताक्रुज विलेपार्ला अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या अर्धा ते एक तासाच्या प्रवास मात्र वाहन चालकांना या वाहतूक कोंडीमुळे दीड ते दोन तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सोडवायचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.
लष्कराच्या विंग कमांडरच्या घरावर पहाटे दरोडा
पुणे शहरातल्या जांभुळकर चौक परिसरात लष्कराच्या विंग कमांडरच्या घरावर दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या कौशल्या बंगल्यात पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान दोन अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून थेट त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश करत जबरदस्तीने कपाटातून तब्बल 40 तोळे सोने आणि 8.5 लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पुणे शहरात सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे, लष्कराच्या अधिकाऱ्याच्याच घरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























