15 महिन्यांत 390 टक्के रिटर्न्स देणारी कंपनी घेतेय मोठा निर्णय, सोनं विकणारी कंपनी तुमच्या आयुष्याचं सोनं करणार?
सोन्याचे दागिने विकणारी ही कंपनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. आयपीओ आल्यानंतर ही कंपनी मल्टिबॅगर ठरलेल आहे. आता लवकरच ही कंपनी मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Senco Gold Share Price: सध्या शेअर बाजारात मोठे चढऊतार पाहायला मिळत आहेत. सध्या शेअर बाजारात काही कंपन्या गुंतवणूकदारांना बम्पर रिटर्न्स देत आहेत. तर काही कंपन्यांत पैसे गुंतवल्यामुळे अनेकांना फटका बसला आहे. अशा स्थितीत सोन्याच्या दागिन्यांचा व्यापार करणाऱ्या सेनको गोल्ड या कंपनीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या कंपनीने आजच्या सत्रादरम्यान, गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. ही कंपनी भविष्यात मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. याच शक्यतेमुळे गुंतवणूकदार या शेअरवर तुटून पडले आहेत. त्यामुळे सोन्याचे दागिने करणारी ही कंपनी गुंतवणूकदारांच्या आयुष्याचं सोनं करणार का? असे विचारले जात आहे.
सेनको गोल्ड (Senco Gold Stock) या कंपनीने मंगळवारी शेअर बाजारावर चांगलीच भरारी घेतली. 1 ऑक्टोबर 2024 रोजी सत्रादरम्यान, हा शेअर आपल्या उच्चांकी पातळीवर गेला. बाजार चालू झाला तेव्हा या शेअरचे मूल्य 1478 रुपये होते. त्यानंतर हा शेअर साधारण 8 टक्क्यांपर्यंत वाढून 1544 रुपयांच्या आपल्या सर्वोच्च स्थानावर गेला. या कंपनीने नुकतेच स्टॉक एक्स्चेंजला आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. ही कंपनी मोठा आर्थिक निधी गोळा करण्याच्या तयारीत आहेत. तसेच शेअर विभागणीवरही (स्टॉक स्प्लिट) ही कंपनी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळेच भविष्यात घडणाऱ्या या घडामोडी लक्षात घेता गुंतवणूकदार या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्सूक आहेत.
येत्या 4 ऑक्टोबर रोजी संचालक मंडळाची बैठक
या कंपनीने स्टॉक एक्स्चेंजकडे (Stock Exchange) रेग्युलेटरी फायलिंगच्या माध्यमातून काही माहिती दिली आहे. या माहितीनुसार येत्या 4 ऑक्टोबर रोजी सेनको गोल्ड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहेत. या बैठकीत कोणकोणत्या मार्गाने निधी उभा करता येऊ शकतो, यावर विचार होणार आहे. त्यानंतर घेतलेल्या निर्णयावर शेअरधारक आणि अन्य नियामक संस्थांकडून मंजुरी घेतली जाणार आहे. याच बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या शेअर्सचे सब-डिव्हिजन किंवा स्प्लिटच्या प्रस्तावाला मंजूर केले जाणार आहे.
आयपीओनंतर 390 टक्क्यांनी दिलेत रिटर्न्स
सेनको गोल्ड या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. हा शेअर आता थेट मल्टिबॅगर ठरलेला आहे. जुलै 2023 मध्ये या कंपनीचा आयपीओ आला होता. ही कंपनी 317 रुपयांच्या इश्यू प्राईजवर शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली होती. 317 रुपयांच्या हाच स्टॉक आता दीड हजार रुपयांच्याही पुढे गेला आहे. म्हणजेच केवळ 15 महिन्यांत या कंपनीने पल्या गुंतवणूकदारांना 387 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. 2024 साली आतापर्यंत हा स्टॉक 114 टक्क्यांनी तर एका वर्षात हा शेअर 141 टक्क्यांनी वधारलेला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 11,572 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
नोकरदाराना ग्रॅच्युईटीचे हे नियम माहिती असायलाच हवेत, जाणून घ्या कायदा काय सांगतो?
NTPC, स्विगी ते ह्युंदाई, पुढच्या तीन महिन्यांत तब्बल 60000 कोटींचे आयपीओ, पैसे ठेवा तयार!