एक्स्प्लोर

Agricultural : वयोवृद्ध जोडप्यानं खडकाळ माळरानावर फुलवली चिकुची बाग, वाचा एका जिद्दीची कहाणी

agricultural News : नांदेड शहरालगत असलेल्या तुप्पा गावात एका वृद्ध जोडप्याने अपार मेहनत घेऊन माळरानावर चिकुची बाग फुलवली आहे.

Marathwada Agricultural News :  मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत. याच मराठवाड्यात एका वृद्ध शेतकरी जोडप्याने चिकुची बाग फुलवली आहे. नांदेड शहरालगत असलेल्या तुप्पा गावात एका वृद्ध जोडप्याने अपार मेहनत घेऊन माळरानावर चिकुची बाग फुलवली आहे.  71 वर्षीय शंकरराव पाकलवाड या शेतकऱ्याने सेवानिवृत्तीनंतर अडीच एकर जमिनीत चिकुच्या शंभर रोपांची लागवड केली आहे. माळरानावर तेही अत्यल्प पाणी उपलब्ध असताना जोडप्याने मेहनत घेऊन चिकुची बाग फुलवली आहे. त्यासोबतच शेतात घरात लागणारे अन्य भाजीपालाही ते पिकवतात. लागवडीनंतर चौथ्या वर्षांपासून चिकूचे उत्पादन होण्यास सुरुवात झाली. त्या उत्पन्नातून सर्व खर्च भागत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. एकीकडे नापिकी आली म्हणून आत्महत्या करणारे शेतकरी पाहिले की अश्या वृद्ध शेतकऱ्यांना पाहून आश्चर्यचकित व्हायची वेळ आली आहे. 

अल्पभूधारक शेतकरी शंकरराव काशीराम पाकलवाड हे तुप्पा (ता. जि. नांदेड) येथील रहिवासी आहेत. त्यांची जवाहरनगर (तुप्पा) परिसरात तीन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. त्यांनी सिडको (नांदेड) येथील टेस्कॉम कंपनीत तीस वर्षे नोकरी केली व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आज त्यांची दोन्ही मुले जिल्हा परिषद शाळात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलींचे सुशिक्षित घरातील मुलांसोबत लग्न झाले आहे. मुले नोकरीला लागल्यानंतर त्यांनी कंपनी सोडली व गावाकडे राहू लागले. तीन एकर कोरडवाहू शेतीतून उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे त्यांनी बागायती शेती करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी आपल्या शेतात पाच बोअरवेल घेतले. त्यापैकी फक्त एका बोअरवेलला दोन इंची पाणी लागले. एवढ्या कमी पाण्यावर भिजवण करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी चिकूची लागवड करण्याचे ठरवले व सन 1990 मध्ये अडीच एकर क्षेत्रावर 100 चिकूच्या रोपांची लागवड केली. त्या झाडांना ते एक इंची पाइप अंथरून पाणी देत. बोअलवेलवरील मोटार चार तास बंद ठेवल्यानंतर केवळ दीड ते दोन तास पाणी येते.

कमी पाण्यावर आजतागायत बाग जिवंत ठेवली आहे. लागवडीनंतर चार वर्षांनी त्या बागेतून चिकूचे उत्पन्न मिळण्यास सुरु झाले. तेव्हापासून ते केवळ या पिकावर आपल्या पत्नीसह स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. मुले नोकरीला असली तरी पैसे मागण्याची गरज नाही. या बागेला सध्या वर्षाला आठ ते 10 हजार एवढा कमी खर्च लागतो. त्यामुळे आज आम्हा पती-पत्नीला तीन एकर जमिनीचे उत्पन्नच संपत नाही. मुले नोकरीला असली तरी, आम्हाला त्यांच्या पैशाची अपेक्षा नाही, असे शेतकरी शंकरराव काशीराम पाकलवाड मोठ्या अभिमानाने सांगतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Drone : छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीच्या वेळेस उडणाऱ्या ड्रोनचा उलगडाVidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणाABP Majha Headlines : 06 PM: 28 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 28 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
Election Commission : 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
Pravin Tarde: 'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
Embed widget