Who is Manoj Jarange Patil Mumbai Morcha: जालन्यातील शाहगडमध्ये वास्तव्य, आरक्षणाच्या लढ्यात 2.5 एकर जमीन विकली; कोण आहेत मनोज जरांगे पाटील?
Who is Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मराठ्यांचं वादळ पुन्हा मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमके कोण आहेत?, अशी चर्चा रंगली आहे.

Who is Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज सकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात आजपासून आंदोलन करणार आहेत. मनोज जरांगेंसह लाखो मराठा आंदोलकही मुंबईत पोहचले आहे. मराठा आंदोलकांचा ताफा मुंबईत दाखल होताच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मनोज जरांगे 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीवरून मुंबईसाठी रवाना झाले होते. आळे फाटा, शिवनेरी-खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर असा प्रवास करत आज सकाळी मनोज जरांगे पाटील मुंबईत पोहचले. दरम्यान, मराठ्यांचं वादळ पुन्हा मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमके कोण आहेत?, अशी चर्चा रंगली आहे.
कोण आहेत मनोज जरांगे पाटील? (Who is Manoj Jarange Patil?)
1. पूर्ण नाव मनोज रावसाहेब जरांगे...
2. जरांगे-पाटील या नावाने प्रसिद्ध...
3. वय 43 वर्षे,1 ऑगस्ट 1982 चा जन्म...
4. गेवराई तालुक्यातील मातोरीचे रहिवासी...
5. चार भावांमध्ये सर्वात कनिष्ठ...
6. सुमित्रा पाटील असे पत्नीचे नाव...
7. तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये...
8. जालन्यातील शाहगडमध्ये सध्या वास्तव्य...
9. 15 वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या लढ्यात...
10. शिवबा संघटनेची स्थापना करुन आंदोलने...
11. आरक्षणाच्या लढ्यात 2.5 एकर जमीन विकली...
मनोज जरांगेंची आतापर्यंतची उपोषणं-
- पहिले उपोषण
29 ऑगस्ट ते 14 सप्टें, 2023
अंतरवाली-सराटी
- दुसरे उपोषण
25 ऑक्टो ते 2 नोव्हेंबर 2023
अंतरवाली
- तिसरे उपोषण
26 आणि 27 जानेवारी 2024
नवी मुंबई
- चौथे उपोषण
10 ते 26 फेब्रुवारी 2024
अंतरवाली
- पाचवे उपोषण
4 ते 10 जून 2024
अंतरवाली
- सहावे उपोषण
20 ते 24 जुलै 2024
अंतरवाली
- सातवे उपोषण
25 ते 30 जानेवारी 2025
अंतरवाली
- आठवे उपोषण
29 ऑगस्ट
आझाद मैदान
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा...13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
























