एक्स्प्लोर
स्वतःची लग्नपत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू
किरण रविकांत सावंत असे या तरुणाचे नाव आहे. या अपघतात किरणचा मित्र जखमी झाला आहे.
सिंधुदुर्ग : दोडामार्ग येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघात झाला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आज सकाळी 10 वाजता डेगवे येथे हा अपघात झाला.
किरण रविकांत सावंत असे या तरुणाचे नाव आहे. किरण मूळचा रत्नागिरीतील देवरुख इथला राहणारा होता.
या अपघातात किरणचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
किरण सावंतचे तीन दिवसानंतर लग्न होणार होतं. दोडामार्ग येथील आपल्या नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी दुचाकीवरुन तो चालला होता. डेगवे येथे समोरुन येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने किरणचा जागीच मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement