एक्स्प्लोर

रक्तदानासाठी तरुणाईची सोशल मीडियावर मोहीम, 3 दिवसात 400 पेक्षा जास्त तरुणांचं रक्तदान

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याच वेळी राहुल आणि त्याच्या टीमच्या आवाहनानंतर गेल्या तीन दिवसात 400 हून जास्त तरुणांनी रक्तदान केले आहे

मुंबई : रक्तदान हे श्रेष्ठ दान असते आणि आता कोरोनाचे संकट असताना राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा वेळी राहुल साळवे या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदानासाठी कंबर कसली आहे. सोशल मीडियाचा वापर करत राहुल साळवे आणि त्याचा ग्रुप पुण्यात गरजूंना जेवण पुरवणे, रक्तदान मोहीम राबवत आहेत. राहुल आणि त्याच्या टीमच्या आवाहनानंतर गेल्या तीन दिवसात 400 हून जास्त तरुणांनी रक्तदान केले आहे आणि हा टक्का वाढेल असा विश्वास या टीमला आहे. राहुल साळवेला 2010 मध्ये एक अपघातात अपंगत्व आले. त्या अपघाताच्यावेळी राहुलला 100 अपरिचित लोकांनी रक्तदान करुन रक्त दिले. त्यामुळेच तो बरा होऊ शकला. त्यानंतर राहुलच्या मनात लोकांना मदत करायची ही जाणीव होती. यासाठी राहुलला साथ मिळाली ती 22 वर्ष एका आजारामुळे खिळून राहिलेल्या दीक्षा दिंडेची. शिवाय पुण्यातून पूजा भडांगे, चिन्मय साळवी, सुजीत नवले, साताऱ्यातून सुनील चव्हाण, कोल्हापुरातून सिद्धांत मंगोलीकर आणि मुंबईतून रुपाली कदम आणि नितीन जाधव हे त्यांच्या मदतीला धावून आले. पुण्यात पोलिसांच्या मदतीने रक्तदान शिबीर करता येईल का याचीही चाचपणी सध्या ते करत आहेत. एकूणच सध्याच्या परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी राहुल साळवे, दिशा दिंडे आणि त्यांच्या टीमसारखे तरुण बाहेर येऊन प्रयत्न करत आहेत. त्यांना राज्यातील सगळ्यांनाच रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी (Rahul Siddharth Salve 9967116687, Diksha Dinde- 8850218378) या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. रक्ताचा तुटवडा, रक्तदान करावं : राजेश टोपे राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसंचय आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये, हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करुन रक्तदान शिबिरं घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टन्सिंग पाळावं, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget