एक्स्प्लोर

Tik tok वर कुत्र्याचा व्हिडीओ अपलोड करणे युवकाच्या अंगलट

टिकटॉकवर कुत्र्याचा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या युवकाच्या विरोधात एका सामाजिक संस्थेने पोलीसात धाव घेतली. या प्रकरणी युवकाने माफी मागितली आहे.

चंद्रपूर : सोशल नेटवर्कींग साईटवर प्रसिद्धी मिळविण्याकरिता आजचा युवावर्ग काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. यामध्ये अजाणतेपणी स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवाशी खेळ खेळल्याचेही प्रकार समोर आले आहे. याच प्रकारचा क्रूर व्हिडीओ टिकटॉकवर एका चंद्रपूरकर युवकाने व्हायरल केला. एका सामाजिक संस्थेने याविषयी पोलीसात तक्रार केल्याने हे प्रकरण युवकाच्या चांगलचे अंगलट आले. शहरातील रामाळा तलावाच्या पाळीवर असलेल्या एका कुत्र्याला या युवकाने दोन्ही पाय पकडून अचानक पाण्यात टाकले वर त्याला फिल्मी संवादाची जोड दिली. हा व्हिडीओ सोशल साईट्सवर टाकल्यानंतर प्राणी संरक्षणाशी निगडित 'प्यार फाउंडेशन'ने पुढाकार घेत चंद्रपूर शहर ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत शहर पोलिसांनी त्या युवकाला बोलवून समज दिली आहे. युवकाने असा व्हिडीओ किंवा असे कृत्य पुन्हा करणार नाही याची ग्वाही देत माफीनामा दिलाय. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मुक्या जनावरांशी खेळ योग्य नाही याकरिता अशा व्यक्तीला समज देण्याची आणि गरज पडल्यास कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत प्यार फाउंडेशनने व्यक्त केले आहे. प्रसिद्ध होण्यासाठी जीवघेणे स्टंट - सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करताना दिसत आहे. यात व्हिडीओ माध्यमाचा वापर आघाडीवर आहे. मात्र, सर्वांपेक्षा वेगळं करण्यासाठी तरुणाई जीवघेणे स्टंट करतानाही मागेपुढे पाहत नाही. परिणामी अपघात होऊन अनेकदा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी टिकटॉक व्हिडिओ करताना होणारे अपघात टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टिकटॉक पुन्हा सुरु झालं, तसं या अपघातांनाही पुन्हा निमंत्रण मिळाल्याचं दिसत आहे. टिकटॉक व्हिडीओ तयार करताना गावठी कट्टयातून गोळीबार झाल्याने एका युवकाला आपला जीव गमवावा लागला. शिर्डीच्या भरवस्तीत असलेल्या एका हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. टिकटॉक अॅपवर बंदीसाठी उच्च न्यायालयात याचिका - सध्या तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉक या मोबाईल अॅपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली . हिना दरवेश या मुंबईतील गृहिणीकडून टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तीन मुलांची आई असलेल्या हिना यांचा आरोप आहे की, टिकटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. या अॅपमध्ये अश्लील व्हिडीओ अधिक असतात. या व्यंगात्मक व्हिडीओजमुळे तरुणाईत आत्महत्यांचं प्रमाणदेखील वाढत आहे. तसेच यात अनेकदा जातीवाचक मुद्यांवरही व्हिडीओ प्रसारित केले जातात, ज्यामुळे देशात जातीयवाद भडकू शकतो. संबंधिक बातमी - अवघ्या 55 सेकंदात साकारला 'आळंदी पॅटर्न'; मग खावी लागली तुरुंगाची हवा Jaibhagwan Goyal | माझ्या मनात आजचे शिवाजी नरेंद्र मोदीच, पुस्तकावर जयभगवान गोयल ठाम | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget