एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अवघ्या 55 सेकंदात साकारला 'आळंदी पॅटर्न'; मग खावी लागली तुरुंगाची हवा
सध्या अनेकजण आपल्या अभिनयाची हौस टिकटॉक अॅपवर भागवताना दिसत आहे. अशाच उगवत्या स्टार्सनी 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील थरार अवघ्या 55 सेकंदात साकारला आहे.
पुणे : देवाच्या आळंदीत उगवत्या स्टार्सनी नंग्या तलवारी अन् कोयते नाचवत 'मुळशी पॅटर्न'चा थरार रंगवला. टिकटॉकचे दोन व्हिडीओ त्यांच्या चांगलेच अंगलट आलेत. याप्रकरणी सहा उतावळ्या स्टार्सना तुरुंगाची हवा खावी लागलीये. आळंदी पोलिसांनी ही कारवाई केली.
मुळशी चित्रपटात जे घडलं तेच या टिकटॉक व्हिडीओमध्ये चित्रीकरण केलं गेलंय. 'तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या म्हटल्यावर, आम्ही तुम्हाला खाणारच ना?' हा या चित्रपटातील फेमस डायलॉग आहे. त्यालाच अनुसरुन या उगवत्या स्टार्सनी 'आळंदी पॅटर्न' साकारला. आधी आयटी इंडस्ट्रीसाठी जमिनी गेल्या. यातून भाईगिरीचा उदय झाला, हफ्तेखोरी, खंडणी सुरू झाली. एका भाईला संपवून दुसऱ्या भाईचा उदय झाला अन् नंतर त्याचाही कसा अंत झाला हे मुळशी पॅटर्नमध्ये आपण पाहिलं. याचं चित्रीकरण पुण्याच्या मार्केटयार्ड आणि मुळशी भागात झालं. त्यामुळे या 'आळंदी पॅटर्न' मध्ये आळंदीमधील बाजारपेठ अन् अर्धवट बांधकामांचा आधार घेण्यात आला.
55 सेकंदात 'आळंदी पॅटर्न' -
दिवसा झालेल्या या चित्रीकरणात नंग्या तलवारी अन कोयते हे नाचवण्यात आल्यात. आळंदी पॅटर्नमध्ये तीस सेकंदानंतर इंटरवल असून उर्वरित भाग हा पंचवीस सेकंदाचा आहे. या अवघ्या 55 सेकंदात 'आळंदी पॅटर्न' साकारण्यात आलाय. टिकटॉकचे हे दोन भाग परिसरात व्हायरल झाले. अवघ्या पंचावन्न सेकंदात अख्खा चित्रपटाचा थरार पाहून आळंदी पोलिसांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली अन् नको ती किमया साधणाऱ्या उगवत्या स्टार्सच्या अंगलट हे प्रकरण आलं. सहा स्टार्सना तुरुंगाची हवा खावी लागली पैकी तिघे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तेव्हा उगवत्या स्टार्सनी टिकटॉकवर व्हिडीओ बनवताना काळजी घ्या, अन्यथा तुमची ही वर्हात थेट तुरुंगात जाईल.
टिक टॉक व्हिडिओ करणाऱ्यांनो सावधान!
सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करुन प्रसिद्धी मिळवण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. मात्र ते करत असताना ते किती महागात पडू शकता याचा प्रत्यय आळंदीतील युवकांना आला आहे. बऱ्याचवेळा व्हिडीओ तयार करताना शस्त्रांचं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळतं. मात्र, शस्त्रात्र कायद्याखाली हा गुन्हा आहे. त्यामुळे असं करण्याआधी दहावेळा विचार करा.
हेही वाचा - Tiktok | टिकटॉक' अॅपवर बंदीसाठी उच्च न्यायालयात याचिका
टिकटॉक व्हिडीओचा नाद तरुणाच्या अंगलट | पालघर | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
सोलापूर
निवडणूक
Advertisement