एक्स्प्लोर
Advertisement
हो! थोडा उशीर झाला, आलमट्टी धरणाच्या निरीक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्याची कबुली
कर्नाटकच्या आलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने कोल्हापूर आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
विजापूर (कर्नाटक) : कर्नाटकच्या आलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने कोल्हापूर आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या 4 दिवसात आलमट्टीतून विसर्ग केल्या जाणाऱ्या पाण्याची गती 3 लाख 80 हजार क्युसेकवरुन तब्बल 5 लाख 40 हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आली आहे. परंतु आलमट्टीतून यापूर्वीच जास्त विसर्ग झाला असता, तर पुराची परिस्थिती उद्भवली नसती. असे मत महाराष्ट्रातून कर्नाटकात आलमट्टीच्या निरीक्षणासाठी गेलेल्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी आलमट्टीतून पाण्याचा विसर्ग होण्यास विलंब झाल्याची कबुलीदेखील दिली आहे.
महाराष्ट्रात बाराही महिने सुजलाम सुफलाम असणाऱ्या कोल्हापूर आणि सांगलीवर आज बेचिराख होण्याची वेळ आली आहे. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले, तर कित्येकांवर बेघर होण्याची वेळ आली. या सगळ्या परिस्थितीसाठी आरोपीच्या पिंजऱ्यात कर्नाटकच्या आलमट्टी धरण प्रशासनाला उभं करण्यात आलं आहे.
कालपर्यंत लाखो क्युसेक गतीने आलमट्टी धरणातून पाणी सोडल्याने कोल्हापूर आणि सांगलीकरांना दिलासा मिळेल, असे म्हणत असताना आलमट्टीतून आधी विसर्ग झाला असता तर ही परिस्थितीच उद्भवली नसती, अशी कबुली महाराष्ट्रातून कर्नाटकात आलमट्टीच्या निरीक्षणासाठी गेलेल्या एका अधिकाऱ्यानेची दिली आहे. श्रीपाद मलघम असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते सांगली सिंचन विभागात उपअभियंता म्हणून काम पाहात आहेत.
श्रीपाद मलघम हे गेल्या आठवड्याभरापासून आलमट्टीत तळ ठोकून आहेत. आलमट्टीतून किती पाण्याचा विसर्ग केला जातोय, याचं निरीक्षण ते राज्य शासनापर्यंत पोहोचवत आहेत. मलघम यांच्या या धक्कदायक खुलाशामुळे महाराष्ट्र राज्य सरकार आणि कर्नाटक शासनात सुसुत्रता नसल्याचे दिसून येत आहे. परंतु आम्ही पहिल्यापासूनच सहकार्य करत आहोत, असे मत आलमट्टी धरण प्रशासनाने व्यक्त केले आहे.
आलमट्टीतून मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या या विसर्गाचा फटका कर्नाटकातील कृष्णाकाठच्या 17 गावांनादेखील बसतोय. कर्नाटकातल्या मुद्देबिहाळ तालुक्यातील मसूती आणि मुदोर गावातील अनेक घरं पुरामुळं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. 2005 आणि 2006 सालीदेखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यावेळी कोयना आणि आलमट्टी धरणांच्या अधिकाऱ्यांमधील समन्वयामुळे सलग दुसऱ्या वर्षी पुराचा धोका टळला.
कसे आहे आलमट्टी धरण?
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या विजापूर जिल्ह्यात हे धरण आहे.
महाबळेश्वरमधून उगम पावणाऱ्या कृष्णा नदीवर आलमट्टी धरण बांधण्यात आले आहे.
2005 साली या धरणाचे काम पूर्ण झाले
आलमट्टी धरणाची एकूण क्षमता 123 टीएमसी इतकी आहे
आलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये वारंवार पुरस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला आहे. यंदाची पुरपरिस्थिती पाहता मुखमत्र्यांनी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी बोलून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने दिलासा मिळाला आहे. तरी हे थोडे आधी करता आले असते, तर कित्येक निष्पांपाना आपला जीव गमवावा लागला नसता.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement