एक्स्प्लोर

Maharashtra Rain : आज संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता

आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळत अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. पावसानं उघडीप दिला आहे. परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झालं आहे. सध्या जरी पावसानं उघडीप दिली असली तरी  हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळत अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

जळगाव जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट 

सध्या राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पाच ते दहा ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. अशातच आज हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

यंदा पावसाळ्यात सुरुवातील जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात तुफान पाऊस झाला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याचे पाहायला मिळालं. यामुळं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच रस्ते घरे, जनावरे यांचंही मोठं नुकसान झालं. 23 लाख हेक्टरहून अधिक शेतजमीन अतिवृष्टीमुळं बाधित झाली आहे. दरम्यान, दमदार पावसामुळं राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.

परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण

 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं  दिली आहे. त्यामुळं सध्या राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Jalgaon News : धक्कादायक! गावाला तिन्ही बाजूनं पाण्याचा वेढा, शाळेत जायला रस्ताच नाही, गेल्या दोन महिन्यापासून 80 विद्यार्थी घरीच 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणी वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणी वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले

व्हिडीओ

Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन
Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणी वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणी वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेंचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
Embed widget