एक्स्प्लोर
सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रेला सुरुवात
पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्यायाची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलंय.
पुणे : महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येनिमित्तानं यात्रा सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे.
‘येळकोट येळकोट जय मल्हार’, असा जयघोष करत श्री खंडोबाची पालखी कऱ्हा स्नानासाठी जाते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत कऱ्हा नदीवर पालखीतील खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्तींना विधीयुक्त स्नान घालण्यात येतं. सोमवारी अमावस्या येतं असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते.
पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्यायाची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलंय. खंडेरायाची जेजुरी आज अशी पिवळीधमक झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली.
खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या. या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत गर्दी केली आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement