एक्स्प्लोर

राज्यात तापमानाचा पारा घसरला, नाशिक-मुंबईकरांना हुडहुडी, निफाडचे तपमान 2.4 अंशावर

मुंबईकरांना हवीहवी वाटणाऱ्या थंडीची चाहूल लागली असून तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.

मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्रातील किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने राज्यातल्या जनतेला चांगलीच हुडहुडी भरली आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकच्या निफाडमध्ये झाली आहे. निफाडमध्ये तापमानाचा पारा 2.4 अंश इतका खाली घसरला आहे. यंदाच्या मोसमातील ही सर्वात निचांकी तापमानाची नोंद आहे. काल निफाडमध्ये तापमान 9.4 अंश सेल्सिअस इतकं होतं. आज तापमानाचा पारा सात अंशानी घसरला आहे. मुंबईकरही गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. आज मुंबईचं तापमान 12.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. सध्या किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे सकाळी आणि सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात गार वारे वाहत असून, मुंबईकरांना थंडी अनुभवता येत आहे. भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची थंडी मुंबईकरांना अजून दोन दिवस अनुभवता येणार आहे. हिवाळा सुरू होऊनही मुंबईत मात्र त्याचा परिणाम जाणवत नव्हता. अखेर आता मुंबईत हळूहळू गारठा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र गारठला मुंबईत थंडीची चाहूल सुरू झाली असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मात्र याआधीच थंडी सुरू झाली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पारा 15 अंशांच्या खाली उतरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान 14 ते 16 अंशांच्या आसपास आहे. हे तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा कमी असल्याची नोंद अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे झाली. काही दिवसांपूर्वी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानाचा पारा जास्तच खाली घसरला आहे. रब्बी पिकांसाठी ही थंडी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअच्या खाली गेला आहे. निफाडपाठोपाठ धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात काल 5.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. नाशिकमध्ये 10 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कोकणात निसर्गाचा लहरीपणा; आंबा, काजू महागणार कोकणात सध्या निसर्गाचा लहरीपणा पाहायाला मिळतोय. वातावरण बदलाचा कोकणातील आंबा आणि काजूच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. दरवर्षी हापूस आंबा आणि काजूला डिसेंबरमध्ये मोहोर आल्यानंतर फळ यायला सुरूवात होते. परंतु यंदा मात्र फळ आलेली नाहीत. फळं उशिरा आणि दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात लागणार असल्याने हापूस आंब्याच्या दरातदेखील वाढ होणार आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे औषधफवारणीचा खर्च देखील 10 ते 15 टक्के वाढला आहे. संबंधित बातम्या Nashik Climate | नाशिककरांना हिवाळ्यात विचित्र अनुभव, दुपारी कडक ऊन तर सकाळी थंडी | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget