एक्स्प्लोर
एकनाथ खडसे राज्यातील भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाणार?, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण
मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागल्यानंतर एकनाथ खडसेंची खदखद कधीही लपून राहिली नाही मग ती जाहीर सभा असो, पत्रकार परिषद असो, वा विधानसभेतील भाषण असो. खडसेंनी नेहमी सरकारविरोधी सूर कायम ठेवला.
![एकनाथ खडसे राज्यातील भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाणार?, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण Will Eknath Khadse go to BJP's board of directors? after Cm Fadnavis Statement एकनाथ खडसे राज्यातील भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाणार?, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/24171104/khadase.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्यातील भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांच्या राजकीय भवितव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांना राज्यातल्या पुढच्या मंत्रिमंडळात घ्यायचं की केंद्रात पाठवायचं याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ते भुसावळमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा आज भुसावळमध्ये पोहोचली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते एकनाथ खडसे ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात टाळ वाजवत भजन करताना दिसले. यावेळी एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. महाजनादेश यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून पुन्हा भाजप सरकार येणार हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजवर विरोधात असताना केलेल्या यात्रा नकारात्मक होत्या, मात्र ही महाजनादेश यात्रा सकारात्मकतेसाठी असल्याचंही खडसेंनी म्हटलं आहे.
खडसे भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाणार?
महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि एकनाथ खडसे यांनी गळ्यात टाळ घातले. मात्र मुख्यमंत्र्यानी केलेल्या वक्तव्यानंतर खडसेंचं राजकीय भवितव्य अडवाणी यांच्यासारखे होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागल्यानंतर एकनाथ खडसेंची खदखद कधीही लपून राहिली नाही मग ती जाहीर सभा असो, पत्रकार परिषद असो, वा विधानसभेतील भाषण असो. खडसेंनी नेहमी सरकारविरोधी सूर कायम ठेवला.
पुण्यातल्या एमआयडीसीतल्या जमिनीचा कथित घोटाळा, 2014 च्या विधानसभेत युती तोडण्याची घोषणा, 20104 साली मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह, दाऊद बरोबर संबंध असलेल्याचे कथित आरोप, विरोधी पक्षात असताना, सत्ताधाऱ्यांना मदत केल्याचा आरोप यामुळे खडसे कायम वादात राहिले.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. विरोधी पक्षातल्या नेत्यांना मंत्रिपदं देण्यात आली. पण खडसेंचा विचार झाला नाही. यामुळे आता केंद्रात जे अडवाणींचं झालं, तेच महाराष्ट्रात खडसेंचं होणार का? हाच प्रश्न विचारला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
बीड
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)