एक्स्प्लोर
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, मृतदेह घरातच पुरला

डहाणू: चारित्र्याच्या संशावरुन पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. ही घटना डहाणू तालक्यातील बाहारे डोंगरीपाडामध्ये ही घडली आहे. आरोपी सदू खांझोडे याने एक अपत्य त्याचं ऩसल्याच्या संशयातून पत्नी संगिताची 21 नोव्हेंबरला गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह त्याने घरातच पुरला आणि वसईला निघून गेला. हत्येनंतर पत्नीचा शोध घेण्याचा बनावही त्याने रचल. मात्र, नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी सदूचं घर गाठलं. त्यानंतर गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी आरोपी घरी नसताना चौकशी करण्यासाठी घर गाठले असता घरातील जमीन उकरल्याचे व घरात शेणाने सारवलेले दिसले. गावकऱ्यांना संगीताची हत्या करून तिचा मृतदेह घरातच पुरल्याचा संशय आल्याने त्यांनी तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी पंचासमक्ष घरातच गाडून ठेवलेला महिलेचा मृतदेह उकरून काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदर घटना नोव्हेंबर महिन्यात घडली असल्याचे आरोपीकडून पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक करुन डहाणू येथील न्यायालयात हजर केले असून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा























