एक्स्प्लोर
अयोध्येनंतर उद्धव ठाकरेंनी पंढरपूरच का निवडलं?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे.

उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरमध्ये दाखल
पंढरपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. अयोध्येमध्ये शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंढरपूरचीच निवड का केली? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. "महाराष्ट्रात विठ्ठलाशिवाय आहे काय? विठोबा म्हणजे सावळा राम. अयोध्येनंतर पंढरपूर निवडणं ही उद्धव ठाकरेंची रामभक्तीच आहे. विठुमाऊली हे शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांच, सामान्यांचं दैवत आहे आणि महाराष्ट्रातला कष्टकरी, शेतकरी आज संकटात आहे," त्यामुळे पंढरपूर निवडल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. "प्रभू श्रीरामाचे जे कार्य शिवसेना पुढे घेऊन जात आहे त्यातील अयोध्येनंतरचा पुढचा टप्पा पंढरपूर आहे. आजचा हा दौरा पंढरपूरातील ही एक वारी आहे आणि या वारीच्या माध्यमातून नक्कीच एक राजकीय संदेश जाईल," असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. पंढरपूरमध्ये उद्धव यांची सभाही होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
























