Sanjay Raut : वायकरांच्या 48 मतांच्या निकालावरून वादंग सुरुच; वनराई पोलिस स्टेशनचे पीआय अचानक रजेवर का गेले? संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गठाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालावरून केंद्रस्थानी आलेल्या वनराई पोलीस स्टेशनवरून हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाल्यानंतर सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे. टेस्ला प्रमुख यांनी एलाॅन मस्क यांनी ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेतून हद्दपार केल्याची मागणी केल्यानंतर भारतात पुन्हा एकदा ईव्हीएमवरून वादळ उठलं आहे. या वादामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट राज्यात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या रवींद्र वायकरांच्या निकालाचा संदर्भ मस्कच्या ट्विटला रिप्लाय देताना दिल्यानंतर राज्यांमध्ये ईव्हीएमवरून आणखी घामासान सुरू झालं आहे.
पोलिस स्टेशनचे पीआय राजभर अचानक रजेवर का गेले?
शिवसेना ठाकरे गठाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालावरून केंद्रस्थानी आलेल्या वनराई पोलीस स्टेशनवरून हल्लाबोल केला आहे. पोलिस स्टेशनचे पीआय राजभर अचानक रजेवर का गेले? अशी विचारणा संजय राऊत यांनी ट्विट करून केली आहे. राऊत यांनी ट्विट करत पुन्हा एकदा पोलिस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
वनराई पोलिस स्टेशनचे पी आई राजभर हे अचानक रजेवर का गेले?
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2024
वायकर याना विजयी करणारा मोबाईल फ़ोन पोलिसस्टेशन मधून
बदलण्याचा प्रयत्न झाला.
वायकर यांचा खास माणूस(जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते)
retd.पी आई सातारकर हे वनराई पोलीसस्टेशनात चार दिवसा पासून कायडील करत होते?… https://t.co/Dfq9ClfVah
बेवड्या आरोपीचे blood sample बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत!
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, वनराई पोलिस स्टेशनचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलिस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस (जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते) निवृत्त पीआय सातारकर हे वनराई पोलीस स्टेशनात चार दिवसांपासून काय डील करत होते? वनराई पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे. रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही.वादग्रस्त फोन फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे ऐकले. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणांत बेवड्या आरोपीचे blood sample बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत! लॅब गृह खात्याच्या अंतर्गत येतात!
या ट्विटमध्ये त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पीएमओ इंडिया आणि आदित्य ठाकरे यांना टॅग केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या