एक्स्प्लोर
Advertisement
Curfew in maharashtra | राज्यात संचारबंदी! काय सुरु राहणार आणि काय बंद?
या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरुच राहणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्र करोनाच्या तिसर्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामळेच कोरोना व्हायरसचा होणारा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. काल राज्यात 144 कलम लावले होते. त्यामुळेच आता मला राज्यात संचार बंदी लावावी लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. संचारबंदीच्या या काळात काय काय सुरु राहणार आणि काय काय बंद राहणार याचा आढावा घेऊया.
वाचा : सरकारचा मोठा निर्णय! राज्यात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
काय काय सुरु राहणार?
- जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
- औषधांची दुकानं
- किराणाची दुकानं
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
- दवाखाने, रुग्णालयं
- बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था
- वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा यांसारखी अत्यावश्यक कार्यालयं
- रिक्षा, टॅक्सी सुरु (प्रवाशांची संख्या मर्यादित)
- कृषीमालाशी सबंधित वाहतूक
- रेल्वेतील मालवाहतूक
- नागरिकांचा प्रवास
- मुंबईची लोकलसेवा
- जिल्ह्यांच्या सीमा
- राज्यातील सीमा
- परदेशातून येणारी वाहतूक
- धार्मिक प्रार्थना स्थळे
- खासगी वाहने (अत्यावश्यक कारणांसाठी सुरू राहतील)
- शाळा, महाविद्यालयं
- मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह
- जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement