एक्स्प्लोर

लोणार पाणी पातळी वाढ प्रकरण! यापूर्वी पाऊस कधीच झाला नव्हता का? विश्वास बसेल असे कारण सांगा, न्यायालयाचे सरकारला खडे बोल

लोणार सरोवरातील पाण्याच्या वाढणाऱ्या पातळीचे प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

Buldhana Lonar Lake : जगविख्यात लोणार सरोवरातील पाण्याच्या वाढणाऱ्या पातळीचे प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत.  अशा प्रकारचा पाऊस यापूर्वी कधीच झाला नव्हता काय? विश्वास बसेल असे कारण सांगा असे न्यायालयाने सरकारला म्हटले आहे. लोणार सरोवराच्या पामी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याचा "एबीपी माझा" ने पाठपुरावा केला होता. 

उल्कापातामुळे पडलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवरात गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने जल पातळी वाढत आहे. यामुळे लोणार सरोवरातील 12 व्या शतकातील अनेक प्राचीन हिंदू मंदिरे पाण्यात बुडाली आहेत इतकच काय तर अशा प्रकारे पाण्याची पातळी वाढत राहिली तर या मंदिरांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. शिवाय सरोवराची जैवविविधता ही धोक्यात आली आहे. सरोवरातील पाण्याचे गुणधर्म बदलल्याने लाखो वर्षांच्या इतिहासात प्रथमच या पाण्यात मासेही आढळले आहेत. याचं वास्तव "एबीपी माझा" ने उघड केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेत स्वतःहून याबद्दल जनहित याचिका दाखल करून घेतली. 

सरोवरातील वाढत्या जल पातळीचे कारणे शासनाकडे विचारण्यात आली

काल या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सरोवरातील वाढत्या जल पातळीचे कारणे शासनाकडे विचारण्यात आली. त्यावर शासनाने " यंदा लोणार परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जलस्तर वाढल्याचे कारण मांडलं. "  मात्र न्यायालयाने या स्पष्टीकरणावर आश्चर्य व्यक्त करत " विश्वास बसेल असे किमान कारण सांगा..! अशा प्रकारचा पाऊस यापूर्वी कधीच झाला नव्हता काय..? "  असा प्रति प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला व शासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने न्यायालयाने जल पातळी वाढीमागील नेमके कारणे शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढील सुनावणी दिनांक 4 मार्च रोजी ठेवण्यात आलेली आहे. अद्यापही जिल्हा प्रशासनाने वाढत्या जल पातळीवर कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळे गेल्याच आठवड्यात लोणार येथे मोठा आंदोलनही नागरिकांकडून करण्यात आलं होतं.

गेल्या काही महिन्यांपासून सरोवरातील पाण्याचे चार स्रोत अखंड वाहतायेत

गेल्या काही महिन्यांपासून सरोवरातील पाण्याचे चार स्रोत अखंड वाहत असल्याने पाण्याची पातळी सतत वाढत आहे. परिणामी, आसपासच्या जैवविविधतेचे अस्तित्व मिटण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. असे असताना यासंदर्भात योग्य शास्त्रीय संशोधन झाले नाही. गतवर्षी पावसाळ्यात सरोवरातील पाण्याची पातळी वाढली.

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Embed widget