Genetically Modified : जीएम म्हणजे नेमकं काय? GM वाणांचे फायदे आणि आक्षेप काय?
जीएम म्हणजे नेमकं काय? त्याला मान्यता कशी मिळते? याबाबतची माहिती कृषी अभ्यासक आणि शेतकरी नेते अनिल घनवट (Anil Ghanwat) आणि डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिली आहे.
Genetically Modified (GM) : मोहरीच्या जीएम (Genetically modified) वाणाला देशातील बायोटेक रेग्युलेटर जेनेटिक इंजिनीअरिंग मूल्यांकन समितीनं (GEAC) मान्यता दिली आहे. दिल्ली विद्यापीठाने हे वाण विकसित केलं आहे. दरम्यान, जीएम म्हणजे नेमकं काय? त्याला मान्यता कशी मिळते? याबाबतची माहिती कृषी अभ्यासक आणि शेतकरी नेते अनिल घनवट (Anil Ghanwat) आणि डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिली आहे. जीएम वाणांचा वापर करण्यास परवानगी देणं फायद्याचे असल्याचे मत यावेळी दोघांनीही व्यक्त केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात?
वेगवेगळ्या पिकांच्या जीन्समध्ये फेरफार करुन चांगले गुणधर्म असलेली बियाणे तयार करणे म्हणजे जीएम होय. पिकांच्या जनुकामध्ये सुधारणा करुन विशिष्ट दर्जाची बियाणं तयार केली जातात, यालाच जीएम असं म्हटलं जात, असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली. जीए वाणाची माहिती सांगताना अजित नवले यांनी उदाहरण देखील दिलं, समजा एकादा गहू कमी पाण्यात येतो, त्याचा कमी पाण्यात येण्याचं एक सुत्र घेतलं. दुसरा गहू म्हणजे जो विशीष्ट प्रकारच्या अळीला प्रतिकार करतो. त्या गव्हामधून अळीला प्रतिकार करणारं सुत्र घेतलं. या दोन्ही गव्हामधून चांगलं वाण विकसीत करणं म्हणजेच जीएम असल्याचे नवले यावेळी म्हणाले.
आक्षेप काय?
प्राण्यांचे जीन्स वनस्पीतीमध्ये टाकण्याचे संशोधन काही ठिकाणी सुरु झालं. ते जीन्स वनस्पतीमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्याला काही पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतले.कारण त्या जीएम मध्ये प्राण्यांचे जीन्स टाकल्यामुळं त्याचा मानवी आरोग्याला, पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो असं पर्यावरण वाद्यांचं मत आहे. यामुळं कॅन्सरसारखे आजार देखील होऊ शकतात असाही आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळं प्राण्यांचे जीन्स वनस्पतीत विरतीत करण्यास विरोध होत आहे.
जीएम वाणांना मान्यता देताना काय दक्षता घेतली जाते?
कृषी अभ्यासक आणि शेतकरी नेते अनिल घनवट यांनी देखील जीएम बाबत त्यांची भूमिका मांडली. जीएम वाण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचे घनवट यावेळी म्हणाले. पिकांच्या जनुकामध्ये सुधारण करुन विशिष्ट दर्जाची बियाणं तयार करणं म्हणजे जीएम होय. जीएम बियाणांना मान्यता देताना याचा मानवाला आणि प्राण्यांना कोणताही धोका होणार नाही याची दक्षता घेतली जाते.
जीएम वाण कसं ठरवलं जात?
जीएम वाण ठरवताना ते प्राण्यांसाठी योग्य आहे का? हे बघितलं जातं. तसेच त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, याचाही विचार केला जातो. त्याचबरोबर हे मानवी शरीराला घातक नाही याचाही विचार केला जातो. त्याच्या सर्व चाचण्या करुन परवानगी दिली जात असल्याची माहिती अनिल घनवटांनी दिली. यावरुन जीएम वाणाना मान्यता द्यायची की नाही हे ठरवलं जात असे अनिल घनवटांनी सांगितलं.
आत्तापर्यंत फक्त BT कापसालाच सरकारची परवानगी
जरी मोहरी आणि HTBT कापसाच्या वाणाला बायोटेक रेग्युलेटर जेनेटिक इंजिनीअरिंग मूल्यांकन समितीनं (GEAC) मान्यता दिली असली तरी सरकारनं अद्याप परवानगी दिली नाही. सरकारनं फक्त BT कापूस एक आणि BT कापूस दोन या वाणांनाचं परवानगी दिली असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली. मोहरी आणि HTBT कापसाच्या वाणाला फक्त मान्यता मिळाली आहे, परवानगी मिळणं अद्याप बाकी आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीन जीएम वाण फायद्याचे
जीएम वाणांनी परवानगी मिळणे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याचे आहे. कारण विशिष्ट फवारणी केल्यावर पिकांवर कोणताही धोका होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना भीती बाळगण्याचं काही कारण नाही. दुसरा मुद्दा म्हणजे मजुरांचा प्रश्न आहे. तो देखील यामुळं सोडवण्यास मदत होईल. उत्पादन खर्च कमी येईल. फवारणी करुन पीक चांगलं येईल अशी माहिती अनिल घनवट यांनी दिली. पिकावर पडणारे रोग आणि कीड नियंत्रण करणं देखील यामुळं शक्य होते. मोहरी कापसाबरोबरच हरभरा, सोयाबीन, मका, पपई, सफरचंद या पिकांच्या जीए वाणांना देखील परवानगी मिळावी असे अनिल घनवट म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: