एक्स्प्लोर

दिवाळीपर्यंत महाविकास आघाडीमधील मंत्र्यांचे घोटाळे सिद्ध करू, किरीट सोमय्या यांचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील 900 कोटी रुपयांचा घोटाळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच केला आहे,असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई : दिवाळीपर्यंत आम्ही  पुराव्यासह महाविकास आघाडी मधील मंत्र्याची सर्व घोटाळे सिद्ध करू असा इशारा किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला  दिला आहे.  दिवाळीपर्यंत उद्धव ठाकरे यांची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, तसेच जितेंद्र आव्हाड यांनी देखील आता बॅग भरून बसावे असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीकडून नोटीस देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी सोमवारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव येथील वंजारवाडी भागातील फार्महाऊसची आणि अन्य ठिकाणच्या मालमत्ता पाहणी केली. त्यानंतर सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल देशमुख फरार, एक अनिल जेलच्या दारात, तर उद्धव ठाकरे यांचे दुसरे अनिल जेलमध्ये जाण्याची प्रकिया सुरू झालीय. खरमटेचा मुलगा प्रथमेशच्या नावाने अनेक व्यवसाय आहेत. आता गुरुवारी  खरमटेची  बारामती, मुळशी, पुणे शहरामधील मालमत्ताची पाहणी करणार आहे. त्यामुळे या साऱ्या मालमत्ता या  खरमटेची  की अनिल परब यांच्या हे परब   हे सांगावे. 

बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे विशेष सचिव होते. त्यामुळे  40 प्रॉपर्टीची बेहिशोबी साडेसातशे कोटींची मालमत्ता आहे,ती कुठून आली? याची मागणी आपण केली आहे. तर खरमाटे यांची ही संपत्ती आहे की,अनिल परब यांचा बेनामी पैसा आहे, लवकरच समोर येईल. पण ठाकरे सरकारचा एक अनिल तुरुंगाच्या दरवाजावर आहे,तर दुसरा अनिल म्हणजे अनिल परब मुहूर्त काढत आहे,अशा शब्दात भाजपाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.

शिवसेनेवर निशाणा साधाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील 900 कोटी रुपयांचा घोटाळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच केला आहे,असा आरोप करत उद्धव ठाकरे देखील एक घोटाळेबाज आहेत. त्यामुळे या उद्धव ठाकरे यांच्या इलेव्हन सेनेच्या भ्रष्टाचाराचे घोटाळे आपण पुराव्यानिशी उघडकीस आणणार आहोत आणी दिवाळीपर्यंत ठाकरेची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्याचबरोबर आता अनिल परब यांच्यावर कारवाई झालेली आहे.  पुढच्या आठवड्यात भावना गवळी यांच्यावर कारवाई होणार आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचाही नंबर असून आव्हाड यांना आपली जाहीर नोटीस असणार आहे. त्यामुळे आव्हाड तुम्ही देखील आता बॅग भरायला लागा, असा इशारा किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget