WB Election 2021 : "सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला", उद्धव ठाकरेंकडून अभिनंदन
ममता बॅनर्जी या 'बंगाली' जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मुंबई : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत आहेत. त्यानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला याठिकाणी स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगाल निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला असून आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया, अस उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "ममता बॅनर्जी या 'बंगाली' जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया."
इतर महत्त्वाच्या बातम्या
- WB Election Result 2021 : पश्चिम बंगालच्या निकालामुळे कंगनाचा तिळपापड, "बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लीमांमुळे ममता बॅनर्जींंना यश"
- Election Results 2021: पश्चिम बंगालच्या मतदारांनी भाजपला का नाकारलं? भाजपच्या अपयशाची कारणे काय आहेत?
- West Bengal Election Results 2021 : पश्चिम बंगालमधील यशाबद्दल शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
- Election Results 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडूत सत्ता कोणाची? भाजपची प्रशंसा करत संजय राऊत यांचं भाकित