WB Election Result 2021 : पश्चिम बंगालच्या निकालामुळे कंगनाचा तिळपापड, "बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लीमांमुळे ममता बॅनर्जींंना यश"
पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या कलांनंतर भाजपची समर्थक अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या ट्वीटमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लीमांमुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला येथे यश मिळालं असल्याची टीका कंगनाने केली आहे.
WB Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकीचे कल हाती लागत आहेत, त्यात तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहूमत मिळताना दिसत आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक अटीतटीची होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा करिश्मा कायम असल्याचं या निवडणुकीतून समोर आले आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या मोठ्या नेत्यांची फौज येथे प्रचारासाठी मैदानात उतरली होती. मात्र असं असूनही अपेक्षित यश भाजपला मिळवता आलं आहे. बंगालमधील निवडणुकीच्या कलांनंतर भाजपची समर्थक अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या ट्वीटमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लीमांमुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला येथे यश मिळालं असल्याची टीका कंगनाने केली आहे.
कंगनाने ट्वीटमध्ये काय म्हटलं?
कंगनाने ट्वीट करत म्हटलं की, "बांगलादेशी आणि रोहिंग्या ममता बॅनर्जी यांची सर्वात मोठी ताकद आहेत. जसे कल दिसत आहेत त्यानुसार असं दिसून येत आहे की आता तेथे हिंदू बहूमत राहिलं नाही. आकडेवारीनुसार भारतात बंगाली मुस्लीम सर्वात गरीब आणि वंचित आहेत. चांगली गोष्ट आहे आणखी एक काश्मीर तयार होत आहे."
Bangladeshi's and Rohingyas are biggest strength of Mamata.... with the way trend is looking shows Hindus are no more majority there, and according to the data Bangali Muslims are the poorest and most deprived in whole India, good another Kashmir in the making... #Elections2021
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 2, 2021
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पराभवाची कारणे
- देशातली कोरोना स्थिती ज्या पद्धतीने केंद्र सरकारने हाताळली त्यावर पश्चिम बंगालचे मतदार नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. देशात कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्र सरकारमधील बडे नेते मात्र निवडणुकीच्या कामात जास्त लक्ष घालत होते. याचीही दखल बंगालमधील मतदारांनी घेतली आहे असं लक्षात येतंय.
- कोरोनाचा सर्वाधिक फटका हा कामगार वर्गाला बसला आहे. या काळात लॉकडाऊन लागल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. अनेकांचा रोजगार गेला.
- भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केलेला एकेरी हल्ला कदाचित मतदारांना पटला नाही.
- 'सब कुछ मो' असलेल्या भाजपच्या मोदी ब्रँडमुळे जागा वाढल्या पण भाजपला सत्ता मात्र मिळू शकली नाही.
- भाजपला स्थानिक नेतृत्व नसल्याचा मोठा फटका बसला. त्या उलट ममता बॅनर्जींचे करारी नेतृत्व लोकांनी मान्य केल्याचं पहायला मिळतंय.
- 'खेला होबे' ला बंगालच्या मतदारांनी कौल दिला. 'खेला होबे' ही ममता बॅनर्जींची घोषणा होती.
- 'दीदी ओ दीदी' असा भाजपने एकेरी प्रचार केला. तो प्रचार लोकांच्या काही पचनी पडला नाही. त्यामुळे मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून तो धुडकावला.
- नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी वर्ग भाजपवर नाराज होता.
- दीदींच्या परप्रांतीय टिप्पणीमुळे भाजपचं नुकसान झालं.
- भाजपने आक्रमक प्रचार केला. तो आक्रमकपणा बंगालच्या मतदारांना भावला नसल्याचं स्पष्ट झालंय.
महत्वाच्या बातम्या:
- Election Results 2021: पश्चिम बंगालच्या मतदारांनी भाजपला का नाकारलं? भाजपच्या अपयशाची कारणे काय आहेत?
- West Bengal Election Results 2021 : पश्चिम बंगालमधील यशाबद्दल शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
- Election Results 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडूत सत्ता कोणाची? भाजपची प्रशंसा करत संजय राऊत यांचं भाकित