Maharashtra Rain : 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान कोकणसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
7 ते 11 ऑगस्ट दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
![Maharashtra Rain : 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान कोकणसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन Warning of heavy rain in Madhya Maharashtra including Konkan from 7th to 11th August, citizens are advised to be alert Maharashtra Rain : 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान कोकणसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/04/81e70d14d1f1b82a752903736aa2f1341659586665_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Rain : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे वादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8 ते 10 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसाठी 8, 9 आणि 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 48 तासात तीव्र होत असून, डिप्रेशनमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असल्यानं राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईसाठी 8, 9 आणि 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. दरम्यान, सध्या कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. विविध ठिकाणी पावसामुळं जनजीव विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळं वाहतुकीवनर मोठा परिणाम झाला आहे. गुहागर तालुक्यात मोठा पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
विविध ठिकाणी पावसाची हजेरी
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रांकडून परिस्थिती आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी माहिती दिली. दरम्यान, सध्या राज्यातील विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा
विदर्भात 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यायत आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Rains : मराठवाड्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
- Aurangabad: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; वाहतूक बंद, पिके पाण्याखाली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)