एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात हरवलेलं पाकिट मिळालं विठुरायाच्या दानपेटीत; पाकिट पाहतंय मालकाची वाट
हरवलेली वस्तू आपल्याला पोलिस किंवा ज्याला सापडली त्याच्या मार्फतच मिळते. मात्र, पुण्यातील रघुनाथ कुलकर्णी यांचे हरवलेलं पाकिट चक्क पंढरपुरातील विठुरायाच्या दानपेटीत सापडलं आहे.
पंढरपूर - तीन महिन्यांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागात रघुनाथ कुलकर्णी यांचे पाकिट हरवले होते. याबाबत त्यांनी पोलीसात तर तक्रार दिली नाहीच. शिवाय आपल्या कुटुंबालाही न सांगता दैवाला दोष देत पाकिटाचा विषय सोडुन दिला. हरवलेलं पाकिट त्यांच्या विस्मरणात गेले असतानाच त्यांना अचानक पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातुन फोन आला. त्यांचे पाकिट विठुरायाच्या देणगी पेटीत सापडल्याचे त्यांना सांगण्यात आले, कुलकर्णी काकांना हा सुखद धक्का होता.
पैशाच्या हव्यासापोटी माणूस एकमेकांच्या जीवावर उठलेल्या या जगात बऱ्याच वेळा प्रवास करताना प्रवासी आपले सामान, मौल्यवान वस्तू किंवा पैसे वाहनात विसरतात. हे सामान परत प्रामाणिकपणे परत करतानाच्या घटनाही घडल्या आहेत. हरवलेल्या वस्तूही परत केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. मात्र, ते परत करताना सामान्यपणे मिळालेल्या वस्तूंच्या आधारे त्या व्यक्तीला संपर्क साधला जातो किंवा ऐवज पोलीसांकडे सुपूर्द केला जातो. कुलकर्णी काकांचे पाकिट विठुरायाच्या दानपेटीत सापडल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.
रघुनाथ कुलकर्णी यांना हरवलेलं पाकिट परत मिळेल अशी अपेक्षाच नव्हती आणि तेही विठ्ठल मंदिरातील देणगी पेटीत. पण असेही घडु शकते. ज्याला कुलकर्णीकाकांचे पाकिट सापडले त्याने ते पोलीसात न देता थेट कार्तिकी यात्रेला आल्यावर विठुरायाच्या देणगीपेटीत टाकले. मंदिराच्या दक्षिणापेटी मोजण्यासाठी उघडल्यावर त्यात हे पाकिट मिळाले. यातील कागदपत्रे पाहिल्यावर मंदिर प्रशासनाने कुलकर्णी यांचा नंबर शोधुन त्यांच्याशी संपर्क साधला असता आपले पाकिट असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या पाकिटात असलेली सर्व रक्कम व कागदपत्रे तशीच असुन ज्याला हे पाकिट सापडले त्याने पोलीसात न जाता थेट विठुरायाच्या ताब्यात देणे पसंत केले. त्यामुळेच आज रघुनाथ कुलकर्णी यांचे पाकिट पुन्हा सापडले आहे. हा निरोप मिळाल्यावर आता कुलकर्णी पंढरपूरमध्ये येवुन ते पाकिट ताब्यात घेइपर्यंत सध्या तरी ते मालकाच्या प्रतिक्षेत देवाच्या तिजोरीत सुरक्षित आहे. विशेष म्हणजे, मंदिर प्रशासनानेही ते पाकिट दानपेटीत जमा न करता रघुनाथ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यामुळंच कुलकर्णी काकांना त्यांचे हरवलेलं पाटीक मिळणार आहे.
संबंधित बातम्या -
एटीएममधील राहिलेले पैसे पोलीस कर्मचाऱ्यांनी केले परत
व्हिडीओ - चंद्रकांत पाटिल यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement