एक्स्प्लोर

कपिल आणि धीरज वाधवानला 29 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्चीची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडीने जानेवारीत कपिल वाधवानला अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात सत्र न्यायालयानं वाधवान यांना जामीन मंजूर केला.

मुंबई : डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहारातील आरोपी आणि जामीनावर असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा आदेश डावलून महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास केल्याबद्दल वादात अडकलेले कपिल आणि धीरज वाधवान यांना सीबीआय विशेष न्यायालयाने 29 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपासयंत्रणेनं कोर्टाकडे 4 मेपर्यंत या दोघांची कस्टडी मागितली होती, मात्र कोर्टानं केवळ तीन दिवसांची कोठडी सोमवारी मंजूर केली.

कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्चीची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडीने जानेवारीत कपिल वाधवानला अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात सत्र न्यायालयानं वाधवान यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर देशभरात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता टाळेबंदी जाहीर करण्यात आली असतानाही जामिनावर असलेले उद्योगपती कपिल वाधवान, त्यांचे कुटुंबीय आणि नोकरचाकर अशा एकूण 23 जणांनी 8 आणि 9 एप्रिलला पाच गाड्यातून राज्यांतर्गत प्रवास केला. विशेष म्हणजे या प्रवासासाठी त्यांना राज्याच्या गृह विभागातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी त्यांना स्वत:च्या लेटरहेडवर पत्र दिले होते. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी वाधवान यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

साता-यात पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तिथं 15 दिवस क्वारंटाईन करण्यात आलं. हा कालावधी पुर्ण झाल्यानंतर सातारा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून सीबीआयनं त्यांना त्यांच्याकडील दाखल गुन्ह्यात ताब्यात घेतले. सोमवारी कपिल आणि धीरज वाधवान यांना मुंबईतील सीबीआय न्यायालयात हजर केले. तेव्हा, न्यायालयाने कपिल आणि धीरज वाधवान यांना 29 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

येस बँकेच्या 37 हजार कोटींच्या कर्ज मंजुरीच्या बदल्यात त्याने बँकेचा प्रमुख राणा कपूर व त्यांच्या कुटूंबियाच्या परदेशातील बँक खात्यावर 600 कोटींची लाच दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार ( मनी लाड्रिंग प्रतिबंध कायद्यानवे ) सीबीआयनं 7 मार्चला गुन्हा दाखल केला.

Anil Deshmukh | Wadhwan कुटुंबियांचा ताबा आता सीबीआयकडे : गृहमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

Gokul : अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत, पहिल्याच बैठकीत प्रस्ताव येणार
अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत, पहिल्याच बैठकीत प्रस्ताव येणार
Nana Patole: राहुल गांधींनी केलेले फोन टॅप करण्याचे आरोप खोटे नसून ती वस्तुस्थिती, कारण 'वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र...; नाना पटोलेंचा घणाघात
राहुल गांधींनी केलेले फोन टॅप करण्याचे आरोप खोटे नसून ती वस्तुस्थिती, कारण 'वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र...; नाना पटोलेंचा घणाघात
Satej Patil and Rajesh kshirsagar: सयाजी हॉटेलचं बांधकाम चुकीचं, शिक्षणसंस्थांमध्ये लाखोचं डोनेशन, चंद्रकांतदादा काय चुकीचं बोलले, आता एकनाथ शिंदेंचा आमदार सतेज पाटलांवर तुटून पडला
सयाजी हॉटेलचं बांधकाम चुकीचं, शिक्षणसंस्थांमध्ये लाखोचं डोनेशन, एकनाथ शिंदेंचा आमदार सतेज पाटलांवर तुटून पडला
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार, आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसणार, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार, आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसणार
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Indapur Protest :  नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget