एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विश्वास नांगरे-पाटील आळंदी ते पंढरपूर सायकल वारी करणार!
कोल्हापूर : यंदाच्या वारीमध्ये सुरक्षा, अंमलबजावणी आणि नियोजन याचा आढावा घेणारी सायकल वारी पोलीस दलाच्या वतीने काढण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील स्वतः आळंदी ते पंढरपूर सायकल वारी करणार आहेत. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
वारीच्या दोन दिवस अगोदर पोलीस अधिकारी, कर्मचारी, आणि सामजिक संस्थेचे प्रतिनिधी वारीच्या मार्गावर सायकल वारी काढणार आहेत. या माध्यमातून सुरक्षात्मक उपाय योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. वारकऱ्यांना होणारा त्रास कमी होण्याच्या दृष्टीने ही सायकल वारी महत्वपूर्ण ठरणार असल्याचं नांगरे पाटील यांनी सांगितलं.
कोल्हापूर परिक्षेत्रातल्या राष्ट्रीय महामार्गांवर हेल्मेट सक्ती
कोल्हापूर परिक्षेत्रातल्या राष्ट्रीय महामार्गांवर आणि मुख्य रस्त्यांवर आता हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी करणार येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रात 5 जिल्हे येतात. कोल्हापूरसह, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे ग्रामीण या जिल्ह्यांचा या परिक्षेत्रात समावेश होतो. या 5 जिल्ह्यांमध्ये एका वर्षात 2 हजार 930 जणांचा अपघाती मृत्यू झालाय. त्यातील 80 टक्के मृत हे वाहनधारक होते आणि त्यातल्या कुणीच हेल्मेट परिधान केलं नव्हतं.
गेल्या 6 महिन्यांमध्ये या परिक्षेत्रात जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये 9 कोटी 81 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलाय. तरीही वाहनधारक नियम पाळत नसल्यामुळे आता नांगरे पाटील यांनी बेशिस्त वाहनधारकांना चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.
हायवेवरची ही हेल्मेट सक्ती पहिल्या टप्प्यातली असून त्यानंतर शहरांमध्येही हेल्मेट सक्ती करण्याचा विचार असल्याचं नांगरे पाटील यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement